मंगरूळ नाथ – शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा विभागाचे श्री. जाधव यांच्याशी भाजपा पदाधिकारी सतीशभाऊ हिवरकर यांनी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून पाईपलाईन तोडणाऱ्या दोषींवर तत्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
"जनतेला पाण्यासाठी त्रास होतोय आणि काही बेजबाबदार लोक पाईपलाईन फोडत आहेत, हे खपवून घेणार नाही!" असा स्पष्ट इशारा हिवरकर यांनी दिला आहे.
शहरात पाण्याचा उशिरा किंवा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यातच काही ठिकाणी पाईपलाईन मुद्दाम तोडल्याच्या घटना घडल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे.
सतीश हिवरकर यांनी सांगितले की, "पाण्याची पाईपलाईन फोडणे हे जनतेच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. अशा व्यक्तींवर फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
प्रशासनावर दबाव:
श्री. जाधव यांनी दूरध्वनी संवादात याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, विभागात चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे.
नागरिकांची अपेक्षा:
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, ही सर्वसामान्यांची मागणी आहे.
0 Comments