Ticker

6/recent/ticker-posts

मूर्ती लहान, कीर्ती महान, असलेले डॉक्टर दिलीप काबरा,


.................................................

   महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात फार मोठे मोलाचे कार्य केलेल्या  व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाशिम जिल्ह्यातील वरोली सारख्या गावातून मंगरूळनाथ शहरात वैद्यकी सेवेच्या माध्यमातून व एलआयसीच्या चळवळीत कर्तुत्वान निस्वार्थी सेवाभाव भावनेने समाजसेवा करणाऱ्या डॉक्टर दिलीप काबरा यांना  नजरेआड करून चालणार नाही. म्हणून अशा व्यक्तीची समाजाने नोंद घेणे काळाची गरज आहे.समाजसेवा, सामाजिक कार्याच्या चळवळीत गेली अनेक  वर्षे अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या कार्याने जिल्ह्यातील ग्रामीण सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र असा ठसा उमटवणारा धडाडीचे  कार्य करणारा  डॉक्टर दिलीप मोतीलालजी काबरा होय. यांचे बालपण   वरोलीत   गेले .
 त्यांच्या जीवनाची सुरुवात मोझरी येथील वैद्यकीय महाविद्यालय
  येथे त्यांच्यावर एक प्रकारचे चांगले संस्कार पडले. तसेच सुप्त कलागुणांना वाव मिळाला. व त्यातूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण होऊन अनेक सामाजिक चळवळीत हिरीरीने भाग घेऊन वैद्यकीय क्षेत्रातून गोरगरिबांची सेवा करणे सुरू केले. 

  या कलेचा उपयोग त्यांनी सामाजिक बांधिलकी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता तसेच एलआयसीच्या माध्यमातून  सामाजिक कार्य चालू केले. ते आजपर्यंत अविरत चालूच आहे
      कार्याची छाप पाडलेले सर्वांचे सुपरिचित प्रामाणिक, सुस्वभावी, शांत, लढवय्या,आदर्श,शांतीवादी, व्यक्तिमत्व, सातत्याने गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अहो रात्रंदिवस लढा देत आहे.
  त्यागृतीने सेवाभाव वृत्तीने काम करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर दिलीप काबरा हे नाव पुढे आले. एलआयसीत उत्कृष्ट कार्य करत असल्यामुळे त्यांना अनेक वेळा पुरस्काराने विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहेत. मारवाडी युवा मंच याच्या कार्यास सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या माध्यमातून सुद्धा ते नेहमी सातत्याने कार्यरत असतात त्यांच्या वैद्यकीय सेवा दिलेल्या गावांची नावे वरोली, पारवा, दाभा, सवासनी, चेहेल धानोरा व मंगरूळपीर तालुक्यात जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा केली 
कोरोना काळात त्यांनी वनोजा चेक पोस्टवर उत्कृष्ट रुग्ण सेवा केली व आजपर्यंत त्यांनी सुभाष चौकातील हॉस्पिटलमध्ये अशा अनेक व्याधीग्रस्तांना रोगमुक्त केले अशा या
सामाजिक योद्धास, संघर्ष योद्धा च्या कार्याला मानाचा मुजरा! 
व पुढील  कार्यासाठी अंतकरणापासून  मनःपूर्वक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! शुभेच्छा!!
 हार्दिक शुभेच्छा!!!
.................................................
🌹🌹🌹🌹. 
आपला स्नेही..............
 सुधाकर चौधरी
***************************

Post a Comment

0 Comments