Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण उपक्रम उत्साहात पार


मंगरूळपीर, 15 एप्रिल 2025:
मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर येथे गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत बी.ए. भाग 2 च्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मंगळवार, दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.30 ते 4.30 दरम्यान संपन्न झाला.


या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवरील जनजागृती घडवून आणण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन केले.


या कार्यक्रमामध्ये गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी आहारातील फळे व भाज्यांचे महत्व, अन्न संरक्षणाच्या पद्धती, अन्न भेसळीचे दुष्परिणाम, शिजवण्याच्या विविध पद्धती, मसाल्यांचे प्रकार, तसेच ऍसिडिटी व हृदयविकारांवरील आहार उपचार अशा आरोग्यवर्धक विषयांवर आधारित पोस्टर्स सादर केली. एकूण 12 विद्यार्थिनींनी सहभाग घेत 12 उत्तम पोस्टर्स सादर केली.


या सादरीकरणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये गौरी ठाकूर, अश्विनी लहाने, साक्षी भगत, कल्याणी पाकधने, लाजरी मिटकरी, भक्ती सुर्वे, शिवानी मोरे, निकिता भगत, चैताली पाकधने, अनामिका इंगोले यांचा समावेश होता. त्यांच्या सर्जनशील व माहितीपूर्ण सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्रा. सौ. सुषमा जाजू यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमात डॉ. पवार, डॉ. ताकतोडे, डॉ. भगत, डॉ. कडू, डॉ. वाघोळे, डॉ. देवके, डॉ. रमिज, प्रा. पडवाल, प्रा. एस. एस. जाजू, डॉ. खान, डॉ. शिंदे, डॉ. मोरे, डॉ. जाधव, डॉ. रासेकर, प्रा. मनवर यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे सचिव श्री. चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकूण 55 हून अधिक विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक उपक्रमाचा लाभ घेतला. हा उपक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले 


Post a Comment

0 Comments