Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री यांच्या हस्ते विदर्भातील प्रकल्पग्रस्तांना चेकचे वाटप होणार


 प्रकल्प ग्रस्तांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी वाढीव मोबदला देणे अत्यंत आवश्यक आहे," असे सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे यांनी वारंवार पाठपुरावे करून . त्यांनी अर्जात प्रकल्पांमुळे झालेल्या नुकसानाचे उदाहरणे दिली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाकडून त्वरित पावले उचलण्याची मागणी केली त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
       येत्या १० एप्रिल गुरवार रोजी अमरावती येथे प्रकल्पग्रस्तांना चेक वाटपाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विदर्भातील सर्व सन्माननीय आमदार महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. तरी विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला हजारोंच्या. संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हा. प्रकल्पग्रस्तांना चेक वाटप या ठिकाणी होणार असुन येताना आधार कार्ड झेरॉक्स पासबुक झेरॉक्स. सोबत आणावे. कार्यक्रमात सहभागी होण्या साठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सकाळी ९:०० वाजता पासून रजिस्ट्रेशन सुरु होईल त्या शिवाय हॉल मध्ये एन्ट्री मिळणार नाही. याची दक्षता सर्वांनी घ्यावी. स्थळ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन पंचवटी चौक ते ईर्वीन रोड. अमरावती आपल्या जिल्ह्या तील प्रकल्पग्रस्तांना यांची माहिती द्यावी. वन चुकता कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आव्हान शेतकरी सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई मनोज ठाकरे मंगरूळपीर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments