वाशिम,
वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय श्रीमती भुवनेश्वर यस मॅडम यांच्याशी "पाणी" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी त्यांना "पाणी" विषयक पुस्तक भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला माननीय उपजिल्हाधिकारी श्री देवरे सर, डॉ. हरीश बाहेती (बालरोग तज्ञ, वाशिम), रवींद्र इंगोले, बंडूभाऊ भगत (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी, वाशिम जिल्हा) आणि जलदूत वाशिम टीम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाण्याच्या संरक्षणासाठी व शाश्वत व्यवस्थापनासाठी जनजागृती करणे, प्रशासनाच्या सहकार्याने नव्या उपाययोजना राबविणे आणि जलसंधारणाच्या दिशा ठरवणे या बाबतीत constructive चर्चा झाली. जिल्हाधिकारी मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी सहकार्याची हमी दिली.
0 Comments