औषधांच्या दुकानातून आज औषधं मिळत नाहीत - मिळतो तो फसवेपणाचा विषारी डोस ! डॉक्टर, मेडिकल आणि पीसीडी कंपन्यांचा संगनमताचा स्फोटक प्रकार आता समोर येतोय – आणि ही केवळ लूट नाही, तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा निर्लज्ज व्यापार आहे !
औषध एकच किमतीत खूप मोठी तफावतरुग्णाच्या वेदनांवर औषध नाही, तर नफा कमावण्याचं जहाल विष फासलं जातंय! बाजारात इथिकल कंपन्या असूनही रुग्णांच्या हाती येतंय 'पीसीडी मेडिसिन' – ना क्वालिटी, ना जबाबदारी!
इथिकल कंपनी – 'ज्याचं नाव घेणंही टाळलं जातं!'
WHO प्रमाणित, दर्जेदार औषधे तयार करणाऱ्या इथिकल कंपन्या डॉक्टरांच्या डावात हरवून बसल्या आहेत. का? कारण त्यात डॉक्टरांना 'कट' नाही! त्या औषधांचा प्रचार नाही, कमिशन नाही – मग डॉक्टरलाही रस नाही!
जनरिक – गरीबांसाठी? की डॉक्टरांच्या मर्जीतून?
जनरिक औषधं म्हणे स्वस्त! पण मेडिकलवर एमआरपीला विकून ग्राहकांची सरळ लूट चालू आहे. कोण विचारतो? कोणी चौकशी करतो?
पीसीडी – 'डॉक्टर प्रमोटेड डक्स', की 'डॉक्टर प्रॉफिटेड ट्रॅप'?
फक्त ठराविक डॉक्टरांनी लिहिलेली औषधं, फक्त ठराविक मेडिकलवरच मिळतात! त्याच डॉक्टरांच्या 'खाजगी साठ्यात' असलेल्या औषधांच्या किमती हवेत बोलतात, आणि क्वालिटी जमिनीवर कोसळते!
प्रश्न आहे – ही औषधं कुठून येतात? का नाही प्रशासनाची चौकशी? ट्रक कुठून येतात, कुठे जातात, कोण ठरवतं?
बीएम – बॉम्बे मार्केट की 'बॅकडोअर माफिया'?
रुग्णाला स्टँडर्ड कंपनीचं औषध मागितलं की डॉक्टर म्हणतो – “याचं काही उपयोग नाही, हे घे – माझं आहे.”
हे ‘माझं’ म्हणजे काय? रुग्णाचं जीव डॉक्टरच्या खिशातल्या कंत्राटाच्या हवाली?
आता रुग्ण विचारतोय – "माझा जीव महत्त्वाचा की तुझं कमिशन?"
प्रशासन, FDA, आणि सरकार – किती दिवस झोपून राहणार? किती वेळ लुटू द्यायचं रुग्णांचं आरोग्य?
या बातमीचा उद्देश फक्त एक – जनतेला जागं करणं आणि या औषध माफियांना उघड करणं!
0 Comments