रथयात्रेतून शिवसंस्कारांचा उत्सव !
मंगरुळनाथ : जय जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जय जिजाऊ रथयात्रेचा भव्य प्रारंभ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या रथाचे राजमाता पुतळ्याचे पूजा सौ. उषाताई श्याम खोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जय जिजाऊ महिला मंडळ मंगरुळनाथ व महिला भगिनी मंडळाच्या प्रमुख सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथयात्रेचे स्वागत केले. यामध्ये सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे, जिनिंगप्रेसिंग संचालिका ,सौ. रोशनी राजेश दबडे, सौ. दीपलक्ष्मी शरद रावजी येवले, सौ. राधिका संदीप ठाकरे, सौ. सिंधुताई तुळजापुरे, सौ. गावंडे ताई, सौ. जयश्रीताई जश, सौ. अनिताताई वाघमारे, सौ. निर्मलाताई, सौ. अनुजना सोळुंके ताई आणि सौ. गायत्री ताई यांनी रथयात्रेचे स्वागत अत्यंत उत्साहात केले.
या रथयात्रेत मान्यवर म्हणून श्री अर्जुनराव तनपुरे, श्री सौरभ खेडेकर आणि सौ. सीमाताई यांनी सहभाग घेतला. मंगरूळनाथ येथील माझी नगरसेवक अनिल गावंडे व शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष यांनी शाल व श्रीफळ देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये औपचारिक स्वागत केले.
या ऐतिहासिक रथयात्रेत जय जिजाऊ मित्र मंडळ मंगरुळनाथ व इतर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये निलेश भाऊ तुळजापुरे, गणेश भाऊ गावंडे, पत्रकार नारायणराव आव्हाळे, पत्रकार राजेश दबडे, पत्रकार गजानन व्यवहारे, गोपाल खिराडे, शरद भाऊ येवले (एक मराठा लाख मराठा), गवारगुरु, संजय भाऊ तेलंग सर, बंडूभाऊ भगत, वसंता मोरे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रथयात्रेत महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. जय जिजाऊ महिला मंडळाने जिजाऊंच्या स्फूर्तीने प्रेरित होऊन समाजात नारी शक्तीचा गौरव अधिक दृढ केला आहे. या भव्य कार्यक्रमामुळे परिसरात ऐक्यभाव, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाचा अभिमान पुन्हा उजळून आला.
0 Comments