Ticker

6/recent/ticker-posts

आमचं कोण हलकं-भारी करणार?" – अकोला चौक, मानोरा चौक आणि मंगलधाम परिसरातील काही व्यापाऱ्यांचा उघडपणे काळा धंदा; जीएसटी प्रशासनाची झोप अजूनही सुरूच!


मंगरूळपीर – शहरातील अकोला चौक, मानोरा चौक आणि मंगलधाम परिसर हे आता छुप्या व्यवसायांचं अड्डं बनत चालले आहे. इथले काही व्यापारी जीएसटी नोंदणी न करता लाखोंची उलाढाल करत असून, "आम्ही हफ्ते देतो, आमचं कोणी काही करू शकत नाही" अशी थेट भाषा वापरत आहेत. प्रशासन मात्र केवळ पाहुणं बनून बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रामाणिक व्यापाऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.

गेली अनेक वर्षे हेच व्यापारी करचोरी करत आहेत, नकली बिलांवर व्यवहार करतात, आणि नियम पाळणाऱ्या व्यापार्‍यांची हेटाळणी करतात. प्रशासन यांच्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी शांत का आहे? हाच मोठा प्रश्न आज शहरातील प्रत्येक प्रामाणिक व्यावसायिक विचारतो आहे.

“आम्ही प्रत्येक नियम पाळतो, कर वेळेवर भरतो, पण हे लोक कायद्याच्या बाहेर उभे आहेत आणि कोण त्यांना हात लावणार नाही याची खात्री बाळगतात. मग आमचं हलकं-भारी कोण करणार?” – असा प्रश्न संतप्त व्यावसायिकांनी माध्यमांपुढे उपस्थित केला.

जीएसटी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई न झाल्यामुळे या व्यापाऱ्यांचे धाडस वाढले असून, "पैसा फेक आणि नियम झुकव" हीच पद्धत मंगरूळपीरमध्ये सर्रास चालू आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने आता तात्काळ हालचाल केली पाहिजे, अन्यथा जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही.

न्याय मिळवायचा असेल, तर नियम पाळणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. नुसत्या गोष्टी नकोत – आता कारवाई हवी 

Post a Comment

0 Comments