अंबाजोगाई — एका महिलेवर अशा प्रकारे लाठ्या-काठ्यांनी आणि JCB मशीनने मारहाण केली जाते, हे फक्त धक्कादायक नाही, तर समस्त महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिला सरपंचावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर शेतामध्ये रिंगण करून अमानुष हल्ला करण्यात आला.
सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे, जिल्हा प्रमुख — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महिला फाउंडेशन), वाशिम यांनी या घटनेचा जाहिर निषेध केला असून, आदरणीय अजितदादा पवार, दै. देवेंद्र फडणवीस, आणि पंकजाताई मुंडे यांना नम्र विनंती केली आहे की, अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या सरपंचाची हकालपट्टी तत्काळ व्हावी.
"आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. जे रक्षण करायला पाहिजे, तेच राक्षस झालेत. असा महाराष्ट्र नकोय आम्हाला!" — अशा शब्दांत त्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली आहे.
सौ. ज्योतीताईंनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी आणि या प्रकरणात जलदगती न्याय मिळावा.
0 Comments