माहेश्वरी समाजाच्या लौकिकात भर टाकणारा अभिमानास्पद क्षण
नाशिक | समाजकार्य, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्रभर आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. मीनल लोहिया यांना ‘ओजस गोल्डन लेडी स्पर्धा २०२५’ मध्ये ‘गोल्डन प्रतिभा लेडी अवॉर्ड’ ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेचा, समर्पणाचा आणि सामाजिक भानाचा अधिकृत सन्मान आहे.
महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनेतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत यंदा शेकडो महिलांनी सहभाग घेतला. या सशक्त स्पर्धेत डॉ. लोहिया यांनी आपल्या अद्वितीय कार्यातून स्वतःचा ठसा उमठवत परीक्षकांचे लक्ष वेधले आणि समाजातल्या महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या.
डॉ. मीनल लोहिया यांचे कार्य केवळ त्यांच्या व्यवसायापुरते सीमित न राहता, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी अष्टपैलू योगदान दिले आहे. त्यांचा सेवाभाव, ज्ञानाची ओढ आणि सामाजिक बदल घडवण्याची तळमळ या सगळ्यांचा परिपाक म्हणजेच हा बहुमान.
या सन्मानामुळे संपूर्ण माहेश्वरी समाजात अभिमानाची लाट उसळली असून, या गौरवामुळे अनेक नवोदित महिलांना प्रेरणा मिळेल. डॉ. लोहिया यांचे हे यश म्हणजे महिलांच्या शक्तीला मिळालेली एक उज्वल ओळख आहे.
0 Comments