Ticker

6/recent/ticker-posts

"आठ दिवसांचा अंधार: मंगरूळपीर रोड रोडवर लाईट गायब, प्रशासनाचा गैरजबाबदारपणा उजेडात!"


वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी


मंगरूळपीर रोड रोडवरील स्ट्रीट लाइट्स बंद: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने नागरीक त्रस्त!

मंगरूळपीर – शहराच्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच रोड रोडवरील स्ट्रीट लाइट्स गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. या भीषण अंधारामुळे शहरातील नागरिकांचे रात्रीचे बाहेर पडणे कठीण झाले असून, प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे!

अंधारात वाहतूक ठप्प, अपघातांची भीती, महिलांची सुरक्षितता धोक्यात!
या मुख्य रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधार पसरत असल्याने अपघात,  महिलांना आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना भीती वाटत आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध संताप वाढतोय
नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. "प्रशासन फक्त टेबलखाली बसून तक्रारींचे कागद झाकते, कृती मात्र शून्य!" असा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे

महामार्गावर आठ दिवसांपासून पथदिवे बंद: RPP & JV कंपनीकडून निष्काळजीपणा; प्रशासनाकडून तातडीची कारवाई अपेक्षित!

मंगरूळपीर  शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वाशिम रोडदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर लावलेले पथदिवे दिनांक ३ एप्रिल २०२५ पासून सातत्याने बंद आहेत. हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागातून जात असल्याने, रात्रीच्या अंधारात नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.

आर.पी.पी. पी अँड सी जे.व्ही. (RPP & JV) या कंपनीला पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, आणि लेखी करारानुसार चार वर्षांपर्यंत हे काम त्यांच्याकडेच असणार आहे. मात्र नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या वारंवार प्रयत्नांनंतरही कंपनीकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही.

तांत्रिक कारणांचा आडवा वापर, पण जबाबदारी कोण घेणार?
महामार्गावर अंधाराचे साम्राज्य असून अपघात, चोरी आणि अनुचित प्रकार घडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी पथदिवे बंद राहणे ही अत्यंत गंभीर आणि असंवेदनशील बाब आहे.

अधिकाऱ्यांचा इशारा – आमची जबाबदारी नाही!
मंगरूळपीर नगरपरिषद विभागाने लेखी पत्रव्यवहारात स्पष्ट केलं आहे की, सदर लाईट बंद राहिल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही घटना किंवा अडचणींसाठी त्यांची जबाबदारी राहणार नाही. त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंता, एम.एस.आर.डी.सी., वाशिम यांना तात्काळ कारवाईसाठी पत्र दिलं असून, संबंधित कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्याचीही मागणी केली आहे.

शहरात संतापाची लाट
नागरिक संतप्त असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. "करार करताना मोठ्या अपेक्षा दाखवतात, पण वेळ आली की जबाबदारी झटकतात," असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.


प्रशासन आणि ठेकेदार कंपनीची ही दुर्लक्षी भूमिका थांबवून, तातडीने पथदिवे सुरू करावेत, 


Post a Comment

0 Comments