मंगरूळपीर,
यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय, उनशेंदुर्जना घाट यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत (MOU) गृह अर्थशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस" जनजागृती उपक्रमांतर्गत ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. लुंबिनी गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी मातृत्वाच्या काळात गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्य देखरेखीचे महत्व विशद केले.
प्रा. सुषमा जाजू यांनी गर्भधारणेच्या काळात महिलांना पौष्टिक आहार, रक्ताची कमतरता टाळणे तसेच प्रसूतीपूर्वी व नंतर आवश्यक काळजी घेण्याचे महत्व अधोरेखित करत या दिवसाचे औचित्य स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. फुलारी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी केंद्र व राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तर प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांनी माता मृत्यू दर कमी करणे व सुरक्षित मातृत्वाच्या बाबतीत जनजागृती करणे हाच या दिवसामागचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. एकूण 75 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उपक्रम अधिक प्रभावी व यशस्वी केला.
समन्वयक:
प्रा. सौ. सुषमा जाजू
प्रमुख, गृह अर्थशास्त्र विभाग
यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर
0 Comments