Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्तीचा मध्यरात्री मशाल मोर्चा – आमदार निवासस्थानासमोर तीव्र आंदोलनाची चेतावणी!


मंगरूळपीर – शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभावाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजता आमदार महोदयांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

हातात मशाली, गळ्यात निळा दुपट्टा, भगवा झेंडा आणि डोळ्यांत अन्यायाचा संताप!

या आंदोलनात कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने, परंतु तीव्रतेने न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरणार आहेत. गळ्यात निळा दुपट्टा, भगवा ध्वज आणि हातात मशाली घेऊन मध्यरात्री आमदारांच्या दारात ठिय्या देण्यात येणार आहे.

सरकारला इशारा – आता नाही तर कधीच नाही!
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण आणि सामान्य जनतेसाठी हे निर्णायक आंदोलन ठरणार आहे. मागण्या मंजूर न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या:

  • संपूर्ण शेतकरी कर्जमाफी
  • शेतमालाला हमीभावाची अंमलबजावणी
  • शेतकऱ्यांना वीज पुरवठा २४ तास मिळावा

प्रहार जनशक्तीच्या आंदोलनाची प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली असून, जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.


Post a Comment

0 Comments