Ticker

6/recent/ticker-posts

कधीकधी मनात येते, हे रंग नसते तर आपले जगणे कसे झाले असते? रंग नसते तर हा संपूर्ण निसर्ग आहे तसा नसता. मग कदाचित माणूसही असा नसता! निसर्गाने आपल्यावर रंगांची अशी काही बरसात केली आहे की जीवनाचे हरेक पान खुशीने भरून जाणारच जाणार! होळीच्या दिवशी दरवर्षी आपण हाच अनुभव घेतो.  चेहेरा मध्ये आमच्या गावी होळीच्या दिवशी शानदार उत्सवी वातावरण असायचे. माझे प्रिय आजोबा कर्मवीर बापूरावजी चौधरी  यांच्याबरोबर होळी खेळण्यासाठी प्रत्येक वर्गातले, जातीतले आणि धर्मातले लोक जमत असत. आपलेपणाच्या रंगाने सगळे रंगून प्रत्येक धर्माचा माणूस प्रेमरंगात बुडून जावा असाच हा सण आहे. राजकीय मैदानातले विरोधकही होळीचा सण साजरा करण्यासाठी यायचे. सगळ्यांसाठी ठंडाई आणि गोडाधोडाची रेलचेल असायची. 

होळी  साजरी करण्यामागे सामाजिक सौहार्दाचा धागा नक्की असणार. एक असा दिवस निश्चित करायचा ज्या दिवशी सगळे लोक वैरभाव विसरून एक होतील.


रंगांची बरसात मनसोक्त अनुभवता यावी म्हणून आम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घालायचो. त्यावेळी रसायनमिश्रित रंग नसायचे. आम्ही मित्रमित्र पळसाची लाल फुले गोळा करायला जंगलात जायचो. या फुलांपासून रंग तयार व्हायचा. हळदीच्या पाण्याची पिंपे भरलेली असत. आपले सण निसर्गाशी जोडलेलेच ठेवले पाहिजेत हा विचार बालपणाच्या त्या दृश्यांनी माझ्या मनावर ठसवला. पळसाची फुले आजही भरपूर फुलतात; पण कोण तिकडे लक्ष देते? गुलालाच्या बाबतीत थोडी जागृती झालेली आहे. हल्ली नैसर्गिक गुलाल वापरण्याकडे कल वाढतो आहे; पण तरीही ॲल्युमिनियमच्या रंगांनी भरलेले चेहरे पाहिले, की अशा लोकांची मला कीव येते. रसायनमिश्रित रंगांमुळे दरवर्षी कित्येकांना आपले डोळे गमवावे लागतात.  आपण नैसर्गिक रंगांनीच होळी साजरी केली पाहिजे. होळी पेटवण्यासाठी  झाडेही तोडता कामा नयेत. सण हे निसर्गाच्या संरक्षणासाठी असतात, विनाशासाठी नव्हे!

आपण सगळे जण एकत्र येऊन जीवनाचे प्रत्येक कोरे पान रंगांनी भरून टाकत राहू... प्रेम, स्नेह आणि आपलेपणाचे रंग आपल्या सर्वांच्या जगण्यात सदैव खुललेले राहोत!

Post a Comment

0 Comments