महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनेच्या ‘ओजस गोल्डन लेडी स्पर्धा २०२५’मध्ये राज्यस्तरीय सन्मान मिळवणाऱ्या डॉ. मीनल लोहिया यांचं नाव आता तेजस्वीपणे झळकतंय!
नाशिक | माहेश्वरी समाजाचा अभिमान असलेल्या, कर्तृत्ववान आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. मीनल लोहिया यांना ‘गोल्डन प्रतिभा लेडी अवॉर्ड’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला असून, त्यांच्या या यशामुळे समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र माहेश्वरी महिला संघटनेतर्फे आयोजित ‘ओजस गोल्डन लेडी स्पर्धा २०२५’ मध्ये, संपूर्ण राज्यातून प्रतिभाशाली महिलांनी भाग घेतला होता. मात्र आपल्या बुद्धिमत्ता, सेवाभावी वृत्ती, आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर डॉ. लोहिया यांनी सर्वांना मागे टाकत ‘गोल्डन प्रतिभा लेडी’ हा सन्मान आपल्या नावे केला.
डॉ. मीनल लोहिया यांचं कार्य केवळ आरोग्यसेवा, शिक्षण आणि समाजसेवा पुरतं मर्यादित न राहता, त्यांनी अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, हा पुरस्कार देण्यात आला असून, या गौरवाने केवळ त्यांचं नव्हे तर संपूर्ण माहेश्वरी समाजाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
संपूर्ण राज्यभरातून डॉ. लोहिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने नव्या पिढीला नवे स्वप्न बघण्याची उमेद आणि दिशा दिली आहे.
सादर अभिनंदन, डॉ. मीनल लोहिया! तुमच्या यशाचा झेंडा असाच उच्च शिखरावर फडकत राहो!
0 Comments