Ticker

6/recent/ticker-posts

इंझोरीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात पार पडला!


इंझोरी (ता. मानोरा) येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या रविदास महाराजांच्या शिकवणीचा जागर करत तीन दिवसांच्या या उत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.


दिनांक 13 एप्रिल रोजी टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली. गावभर रथात विराजमान झालेल्या रविदास महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. भिक्कमपुरी महाराज यांच्या दिंडीने मिरवणुकीला भक्तीमय रंग चढवला. गावातील भाविक, महिला, पुरुष आणि बालगोपाल यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मिरवणुकीला गौरवशाली बनवले.


14 एप्रिल रोजी मंदिरात मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गावकऱ्यांचा उत्साह, भक्तिभाव आणि सामूहिक सहभाग यामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला. समाज मंदिर उभारणीसाठी दिलेल्या सहकार्याच्या गौरवार्थ दिनांक 15 एप्रिल रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान. माधवराव गायकवाड होते. उद्घाटन मा. अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये जि.प. अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, समाधानजी माने, दीपक ढोके, राहुल तुपसांडे, विनाताई अजय जैस्वाल, अँड मनीषाताई दिघडे, विमलताई राजगुरू, सीमाताई वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रणजीत इंगोले, श्रीरंग इंगोले, चंद्रकांत इंगळे, मनोहर इंगोले, मुकिंदा इंगोले, प्रा. डॉ. संतोष इंगोले व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संचालन कु. वैशाली पानझडे तर आभार प्रदर्शन कु. मोनाली इंगोले यांनी केले.

संत रविदास महाराजांच्या “ऐसा चाहूं राज, जहां सबन को मिले अन्न” या दोह्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देत चर्मकार समाजाने एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला. या ऐतिहासिक क्षणासाठी इंझोरी गावाने एकत्र येत समाजाच्या इतिहासात अजरामर अशी शिदोरी रचली आहे.


"समतेच्या वाटचालीतला एक प्रेरणादायी सोहळा – इंझोरीचा अभिमान!"

Post a Comment

0 Comments