Ticker

6/recent/ticker-posts

माँ सरस्वती संगीत विद्यालयाच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन


. "उन्हाळ्याची सुट्टी करा सुरमयी !"

मंगरूळपीर : संगीताची आवड निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता व आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने माँ सरस्वती संगीत विद्यालय, मंगरूळपीर यांच्या वतीने १५ एप्रिल ते १० मे २०२५ दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत मान्यता प्राप्त परीक्षा केंद्र (केंद्र क्रमांक १२४६) येथे भरवले जाणार आहे.

शिबिरामध्ये गायन, हार्मोनियम, तबला (बेसिक कोर्स) यासारख्या संगीतविषयक शिक्षणासोबतच फिल्मी डान्स, सोलो डान्स, समूह नृत्य, तसेच चित्रकला, रेखाचित्र, क्राफ्ट, योग, प्राणायाम, ध्यान, इंग्रजी संभाषण, श्लोक पठण, पोस्टर रंगोळी, संस्कारभारती, मेहंदी अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

संगीत क्षेत्रात पुढे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रारंभीक ते विशारद स्तरावरील प्रमाणपत्र परीक्षांचे प्रशिक्षण देखील शिबिरात दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिबिरानंतर प्रमाणपत्र दिले जाणार असून, शिबिराच्या समारोपाला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

महिलांसाठी स्वतंत्र बॅच तसेच ५ ते १२ वयोगटातील मुलींसाठी विशेष प्रवेश उपलब्ध आहे.

संगीत शिक्षिका सौ. पाटील मॅडम (एम.एम. संगीत विशारद) यांच्याकडून संगीत विषयाचे प्रशिक्षण दिले जाईल. इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, कारण जागा मर्यादित आहेत.

संपर्क:
सौ. पाटील मॅडम – 9975966091
संचालक राऊत सर, मानोली

मुख्य शाखा: परशुराम चौक, विश्वकर्मा वेल्डिंग जवळ, मंगरूळपीर
उपशाखा: झोलेवावा ड्रेसेसच्या पाठीमागे, बायपास रोड, शहापूर – शेलुबाजार

"सुरांच्या प्रवाहात एक पाऊल पुढे!"



Post a Comment

0 Comments