मंगरुळपीर:
गोर बंजारा धर्मपीठ व संत शिरोमणी सेवालाल महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री. संतोष चव्हाण फौजी यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संतोष चव्हाण फौजी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असून, आपल्या प्रभावी वक्तृत्वशैली आणि सामाजिक जाणिवांच्या माध्यमातून त्यांनी समाजात विशेष ठसा उमटविला आहे. त्यांनी गोर बंजारा बोलीभाषेला भारतीय संविधानाच्या आठव्या परिषदेच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी विदर्भातून सर्वप्रथम राष्ट्रीय बंजारा परिषद मार्फत निवेदन सादर केले. तसेच विविध खासदारांकडून शिफारस पत्र घेत, ते पंतप्रधानांकडे पाठवून या मागणीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.
या सामाजिक योगदानाची दखल घेत पोहरागड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांना ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी गोर बंजारा धर्मपीठाचे धर्मनेते किसन भाऊ राठोड, प. पू. डॉ. आमदार बाबूसिंग महाराज, प. पू. महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक, उपायुक्त भिकन जाधव, डॉ. राम चव्हाण, गणेश पवार, सौ. लताबाई राठोड, कु. शिवकन्या राठोड (पुणे), सौ. जयश्री राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार समारंभात मा. श्री. संजय भाऊ राठोड (कॅबिनेट मंत्री), मा. इंद्रनिल नाईक (राज्यमंत्री), अनिल भाऊ नाईक, बंसल पाटील, खासदार संजय देशमुख, आमदार सईताई डाहके, आमदार निलय नाईक, आनंदकुमार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.
संतोष चव्हाण फौजी यांना सेवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments