Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम शहर मंडळ अध्यक्ष पदाची निवडणूक उत्साही वातावरणात पार पडली


वाशिम, दि. ९ एप्रिल – भारतीय जनता पक्षाच्या वाशिम शहर मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेला आज विश्राम गृह, वाशिम येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्साही वातावरणात सुरुवात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून भाजपा प्रदेश सदस्य मा. विजय पाटील काळे तर सहनिवडणूक अधिकारी म्हणून माजी नगराध्यक्ष मा. विजयजी बगडे हे उपस्थित होते.


या निवडणूक प्रक्रियेला शहरातील भाजप पदाधिकारी, नगरसेवक, बूथप्रमुख, तसेच सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. संपूर्ण प्रक्रिया लोकशाही मूल्यांची जपणूक करत पार पडली असून, पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

भविष्यातील पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी वाशिम शहर मंडळाचे नवीन नेतृत्व कार्यरत होणार असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments