विदर्भातील प्रकल्पग्रस्तांसाठी हा क्षण म्हणजे त्यांच्या संघर्षाला मिळालेलं यशाचं फळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये होणाऱ्या भव्य कार्यक्रमात 832 कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदानाच्या वाटपाचा ऐतिहासिक शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमासाठी विदर्भातील सर्व प्रकल्पग्रस्त महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे साक्षात प्रकल्पग्रस्तांचा आवाज बनलेल्या शेतकरी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ठाकरे यांनी जोरदार आवाहन केले आहे.
"आपल्या संघर्षाला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. काही समस्या मार्गी लागल्या आहेत, हा आपला विजय आहे. पण ही केवळ सुरुवात आहे. आपल्या हक्कासाठी लढा अजून पुढे चालू राहील. या आनंदाच्या आणि विजयाच्या क्षणी आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे," असे ज्योती ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही केवळ उपस्थिती नसून आपल्या संघर्षाला दाद देणं आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेला लढा आणि त्या लढ्याचं सानुग्रह अनुदानाच्या रूपातील फळ सर्वांनी मिळून साजरं करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हा क्षण गमावू नका — संघर्षाचं सोनं करण्यासाठी सर्वांनी अमरावतीला हजर राहा!
0 Comments