Ticker

6/recent/ticker-posts

स्व.स्वप्नील स्म्रुती गोकुलग्राम ला 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत FMD लसीकरण, औषधोपचार व पशु गणना आणि पशुसंवर्धन व पशुकल्याण जनजागृती शिबीर


भुसावळ-महाराष्ट्र शासनाचा १०० दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ कुर्‍हे पानाचे ता. भुसावळ या अंतर्गत ललवाणी फौंडेशन संचलीत स्व.स्वप्नील स्म्रुती गोकुलग्राम येथे(गिर गाय),  पशुगणना आणि पशु गणना पडताळणी सोबत केंद्र शासन पुरस्कृत लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रम ६ वी फेरी अंतर्गत लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण, जंत निर्मूलन व औषधोपचार करण्यात आले. तसेच ईतर लसीकरण करण्याबद्दल माहिती देण्यात आली.
सदर शिबिरात डॉ. प्रशांत सोमनाथ येवले (पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ कुर्‍हेपानाचे), भुसावळ येथील फिरते पशुवैद्यकीय पथक चे डॉ.पवन सरोदे  व चालक फकीरा तडवी हे उपस्थित राहून शिबिराचे काम नियोजनबद्ध पार पाडले.सदर अधिकार्‍यांनी सर्व पशुंची पाहणी करुन या गोशाळेतील सुविधांची सुध्दा पाहणी केली.या प्रसंगी गोवंशाची काळजी घेणारे सोपानभाऊ डामरे,संदीप गायकवाड,महेश जगताप,सुखराम बारेला,अप्पा जगताप हे जातीने हजर होते. गोशाळा संचालक प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी यांनी अधिकारी वर्गाने गोवंशाची केलेल्या सेवेबद्यल आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments