Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिनाचे औचित्य साधून किरणताई कढणे लिखित ‘ध्यासपर्व’ काव्यसंग्रहाचे विमोचन थाटात संपन्न

वाशिम: लाखाळा येथील सौ.सुशीला ताई जाधव विद्यानिकेतनमध्ये कवयित्री किरण नारायण कढणे लिखित ‘ध्यासपर्व’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार विजयराव जाधव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.या सोहळ्याला वाशिम शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.उत्कर्ष वायाळ, विद्यावाचस्पती पुरस्कार प्राप्त प्रा.दिलीप जोशी,जिल्हा पतसंस्था वाशिमचे अध्यक्ष दत्तात्रय इढोळे, मंडळ कृषी अधिकारी गंगाधर इंगोले, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता कढणे, भा. महिला आघाडीच्या अंजली पाठक आणि विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.किरण कढणे यांच्या ‘ध्यासपर्व’ काव्यसंग्रहात जीवनातील विविध पैलूंवर आधारित भावस्पर्शी कविता आहेत.माजी आमदार विजयराव जाधव यांनी त्यांच्या कवितांचे कौतुक करताना, समाजातील सकारात्मक बदलांसाठी साहित्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी कवयित्रीला पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ. उत्कर्ष वायाळ आणि प्रा.दिलीप जोशी यांनीही काव्यसंग्रहाचे मनःपूर्वक अभिनंदन करताना त्यांच्या कवितेतून दिसणारी भावनात्मकता आणि सामाजिक भान याबद्दल गौरवोद्गार काढले.आज महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या या प्रकाशन सोहळ्याने साहित्य आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांच्या सशक्तीकरणासाठी साहित्याच्या भूमिकेवरही चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी कवयित्री किरण कढणे यांनी आपल्या काव्यप्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाने साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व माता पालक बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments