- "शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा" डॉ. श्रीकांत जाधव यांच्यावर कार्यवाहीचा बडगा
मंगरूळपीर येथे शिवसेना मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्याच्या प्रयत्नात आलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत जाधव यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला जाणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुखांनी या प्रकरणात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्याने डॉ. जाधव यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांनी " उद्धटपणे अरे रवी करत तू कोण?" असे अपमानजनक उत्तर दिले. हे प्रकरण मंगरूळपीर येथे घडले, जिथे डॉ. जाधव यांनी चहा पीत असताना ही घटना घडली. शिवसेना पदाधिकाऱ्याने नमूद केले की डॉ. जाधव हे ऑफिसमध्ये क्वचितच हजर असतात, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न चौकातच करण्यात आला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात डॉ. जाधव यांच्याकडे असलेला मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त चार्ज काढून टाकण्याची मागणी केली आहे.व ते रुजू झाले तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनाला दिलेला अतिरिक्त बिल असो त्यांनी काढलेल्या खर्चाचा विचार करून त्यांच्या दस्तऐवजाची चौकशी अशा मुजोर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे . परिसरातील नागरिकात अशा डॉक्टर प्रति रोष निर्माण होत आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की यापुढे अशी अपमानास्पद वागणूक सहन केली जाणार नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मी विचारलेल्या प्रश्नांची अशा पद्धतीने टिंगल टवाळी होत असेल तर यानंतर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.
0 Comments