श्री धानोरकर आदर्श विद्यालयात जागतिक महिला दिनाचा उत्साही कार्यक्रमम हिला सशक्तीकरण ,अंजलीताई धानोरकर
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्त धानोरा खुर्द येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालयात एक उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. अंजली धानोरकर मॅडम यांनी स्वीकारले. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ. चौधरी मॅडम, कु. तेजल तायडे मॅडम, व विद्यालयातील शिक्षिका सौ. योगिता होले मॅडम यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. वर्ग 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी महिला दिनाच्या निमित्त मनोगते, भाषणे व गीते सादर केली. "कर्तृत्ववान महिला" या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक श्री. उचित सर यांनी स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल मार्गदर्शन केले व शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी कु. तेजल तायडे मॅडम यांनी स्त्रियांच्या कामगिरीबद्दल माहिती दिली, तर सौ. चौधरी व सौ. होले मॅडम यांनी महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात सौ. धानोरकर मॅडम यांनी भारतातील सुधारक स्त्रियांचे योगदान व शिकलेल्या स्त्रीच्या यशाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग 9 ची विद्यार्थिनी कु. साक्षी ठाकरे हिने केले, तर आभार कु. ज्ञानेश्वरी सावके हिने मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments