.... जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम आणी तहसील कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथील नियोजन हाॅलवर आज 12/3/2025 रोजी आयोजन करण्यात आले होते
▶️ वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी मॅडम यांच्या आदेशानुसार निवासी उप-जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे सर यांचे नेतृत्वात आज 12 मार्च 2025 रोजी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन पुर्ण तयारी,त्यावर उपाययोजनांबाबत करावयाच्या कार्यवाही तसेच पूर,विज,आग,भूकंप,भुसख्खलन,रस्ते अपघात,सर्पदंश, उष्मलाट व जलतारा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी मा.श्री.पळसकर सर तहसीलदार वाशिम हे होते तर प्रमुख अतिथी श्री.अणिल रुईकर सर वै.अ.सा.रु.वाशीम, जि.आ.व्य.अ.शाहु भगत साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी तहसीलदार निलेश पळसकर सर यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.व्य.अ.शाहु भगत यांनी केले सदर प्रशिक्षणाचे मार्गदर्शक आजचे प्रशिक्षक दिपक सदाफळे [जिवरक्षक] प्रमुख मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोला यांनी पुर,आग,प्रथमोपचार,रस्ते आणी ईतर अपघात,विज, सर्पदंश,आपत्ती व्यवस्थापन आणी शोध व बचाव या विषयांवर योग्य मार्गदर्शन करुन प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिके करुन दाखविले. पर्यावरण जलसंधारण या विषयावर मा.पवन भाऊ मिश्रा तसेच आरटीओ परिवहन विभागाचे वाहन निरिक्षक संजय पल्लेवाड सर,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुका स्तरावरील अधिकारी,तसेच समाधान राठोड सर ना.त.वाशीम, साहेबराव नप्ते सर नै.आ.व्य.ना.त.वाशीम डाॅ.मनिषा चव्हाण ता.आ.अ. वाशिम सचिन मोरे साहेब अ.का.तहसील वाशिम,सास चे शाम सवई,छत्रपती ब.उ.गजानन मेसरे आणी सरपंच,मंडळ अधिकारी ग्रामसेवक,तलाठी,कृषि सहाय्यक,पोलिस कर्मचारी, मुख्याध्यापक,आरोग्य सेवक/सेविका,अंगनवाडी सेविका, आशा वर्कर,कोतवाल, रोजगार सेवक,उमेद अभियान व्यवस्थापक,रोजगार हमी योजनेच्या विभागातील कर्मचारी व इतर विभातील कर्मचारी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाशिम तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या सर्च ॲण्ड रेस्क्यु टीम चे अंकुश सदाफळे, मयुर सळेदार,महेश वानखडे, शेखर केवट,मयुर कळसकार, अश्विन केवट,शुभम भोपळे, यांनी अथक परिश्रम घेतले.अशी माहीती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ना.त.साहेबराव नप्ते सर यांनी दीली आहे
0 Comments