प्रतिनिधी श्रावणी कामत
लोणावळा
- ऑक्झीलियम कॉंन्व्हेंट हायस्कूल, रायवूड लोणावळा येथील ५० विदयार्थींनी आणि ५ शिक्षकांनी मिळून लोणावळा शहरातील बाजार विभागात पर्यावरण जनजागृती आणि प्लास्टिक बंदी बाबत एक रॅली काढली. या रॅलीमध्ये विदयार्थींनी स्वतः घरी तयार केलेल्या प्लास्टिक पिशव्या दुकानदारांना वाटल्या. यामध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे विरोध करणारा संदेश दिला गेला.
रॅलीमध्ये नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. नंतर सर्व विदयार्थी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात एकत्र झाले आणि तिथे पर्यावरणाबद्दल आपले विचार मांडले. कापडी पिशव्या वापरण्याच्या महत्त्वावर चर्चा केली आणि लोणावळा शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शपथ घेतली.
या उपक्रमात नगरपरिषदेचे श्री. शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष खाडे, पत्रकार श्री. विशाल पाडाळे, श्री. विशाल विकारी, श्री. संजय पाटील, श्री. सुनिल म्हसके, श्री. सागर शिंदे, लेखा विभागाचे लेखापाल श्री. निलेश काळे, सहा. ग्रंथपाल श्री. विजय लोणकर, सिटी कोऑर्डिनेटर श्री. विवेक फडतरे उपस्थित होते.
ऑक्झीलियम हायस्कूलच्या शिक्षक आणि विदयार्थी, सिस्टर शायनी आल्फोन्ज, सिस्टर ज्युडी गायकवाड, आसमा निबंर्गी, युनिटा पॅटराव, सिमा खान यांच्यासह ५० विदयार्थीही उपस्थित होते. या उपक्रमामुळे पर्यावरण जागरूकतेचा संदेश प्रगल्भ झाला आणि लोणावळा शहर प्लास्टिक मुक्त होण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल टाकला.
0 Comments