प्रतिनिधी श्रावणी कामत
पुणे जिल्हा: महाराष्ट्र राज्य SGF च्या वतीने 12 मार्च 2025 रोजी, सदस्य कर्नल ज्युलियस रॉक यांच्या कल्पनेने आणि पुढाकाराने, श्री गोपाळ हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे येथील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शिवाजीज आय केअरचे डॉ. हेमंत दुलेरा आणि श्री. कुणाल दुलेरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. डॉ.हेमंत दुलेरा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली. नंतर सुमारे 47 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. 47 पैकी 9 विद्यार्थ्यांना पुढील तपासणी आणि चष्म्याची गरज होती. शाळेच्या शिक्षिका सौ. शीतल नागवडे या 9 मुलांना पुढील तपशीलवार तपासणीसाठी डॉ. दुलेरा यांच्याकडे घेऊन जाणार आहेत आणि त्यांना कोणतेही शुल्क न घेता चष्मा प्रदान केला जाईल. इंडियन स्काऊट अँड गाईड फेलोशिप पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.दिनेशकुमार पांडे, विजय जोशी, सुनीती जोशी, माधवी जोशी, प्रियमवदा सक्सेना, हेमलता बंगाळे, अवंतिका राणे, प्रिया कळसकर, ज्योती बेल्लीपा आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील सौ.शीतल नागवडे, कु.ग्रेस जाधव उपस्थित होते. सर्व सभासदांनी डॉ.दुलेरा आणि श्री.कुणाल दुलेरा यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
0 Comments