वाशिम - सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशन च्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून वाशिम शहरात दरवर्षी होळीच्या दिवशी मोक्षधाम स्मशानभूमी मध्ये स्मशान होलिकोत्सव हा कार्यक्रम राबविण्यात येतो.
ह्या वर्षी सुध्दा संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन वाशिमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १३ मार्च रोजी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमी येथे दुपारी दीढ वाजता करण्यात आले होते. या दिवशी सर्वप्रथम सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून संपूर्ण स्मशानाचा परिसरात झाडू खरट्याने झाडून स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, प्लास्टिक कॅरी बॅग्स व गांजर गवताची होळी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजियाणी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्ष संगीता वसंत इंगोले, स्नेहल घारड, अॅड. सुरेश टेकाळे, राजू धोंगडे, प्रवीण इंगोले, दिनेश भानुशाली, शंकरराव देशमुख, रूपाली देशमुख, वृषाली टेकाळे, संध्या सभादिंडे, मेघा दळवी, श्रुती खंडाळकर, आश्विनी खोडके, ज्ञानेश्वरी काकड, दिव्याश्री टेकाळे, हर्षवर्धन टेकाळे, त्रंबक ढवळे, सखाराम भडके, पवन विभूते, रवी हजारे, विष्णू इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments