Ticker

6/recent/ticker-posts

सौ.सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन येथे विद्यार्थ्यांमध्ये होते कला,कौशल्याची रुजवणूक- माजी आमदार विजयराव जाधव


श्री.व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित सुशीलाताई जाधव विद्यानिकेतनमध्ये जागतीक महीला दिनानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुशीलाताई जाधव प्रमुख पाहुणे म्हणून श्री.व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष मा.अँड श्री.विजयराव जाधव (मा.आमदार) सौ. सुनीता कढणे तसेच हॅपी थॉट चे सदस्य मुकुंद देशपांडे,दिलीप जोशी,गजानन दत्तराव इडोळे, शिक्षक  इंगोले, शिक्षिका आफुणे,तज्ञ मार्गदर्शक डॉ.उत्कर्ष वायाळ,गजानन भारडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे उपस्थित होत्या.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची रीतसर सुरूवात केली.त्यांनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर होळी सणानिमित्त विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करतात याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या रंगांची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन घेण्यात आले. त्यानंतर आमच्या शाळेतील माता-पालक सौ. किरण नारायण कढणे यांच्या "ध्यासपर्व" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार विजयराव जाधव व प्रमूख मान्यवरांच्या हस्ते पार पडला. तसेच हॅपी थॉट्स परिवारातील गजानन गारडे यांनी चांगले विचार जीवनात किती महत्त्वाचे आहेत व शाळेतील विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे संस्कार व शिस्त स्वच्छतेचे महत्त्व आहे.तसेच वर्गांना शास्त्रज्ञांची नावे दिली हे एक नाविन्यपूर्ण अशी बाब आहे.अश्या विवीध चांगल्या बाबींचे त्यांनी कौतुक केले. हॅपी थॉट्स या समितीचे कार्याविषयी माहिती सांगितली.त्यानंतर प्रा.दिलीप जोशी सरांनी हॅपी थॉट्स याचे कार्य अध्यात्मामध्ये सत्य व चांगले विचार समाजाच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण आहेत याविषयी माहिती सांगितली.ॲड विजयराव जाधव येसाहेबांनी वाचण्याचे महत्त्व व शाळेमध्ये बाल वाचनालय यातील विविध उपक्रम तसेच विद्यार्थी दररोज वेगवेगळी अवांतर पुस्तकांचे वाचन करतात ही फार महत्वाचे व त्यातून त्यांच्या नैतिक मूल्य व संस्कार याची रुजवणूक होण्यास मदत होते. ही बाब आम्हाला अभिमानास्पद वाटते. त्याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुनिताताई कढणे यांनी जागतिक महिला दिना निमित्त महिलांचे समाजातील स्थान,महिला विवीध क्षेत्रात भरारी घेत आहेत.तसेच आर्थिक व्यवहार, सामाजिक कार्य, विविध मोठमोठ्या हुद्द्यावर आज महीला कार्यरत आहेत.एकंदरीत आजची महीला ही कोणत्याच क्षेत्रात कमी नाही असं मला वाटते.नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे यांनी आपल्या भाषणातून शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती तसेच बाल वाचनालय अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व गोडी निर्माण करण्याचे कार्य अविरत चालू आहे.तसेच विद्यार्थी वाचलेल्या पुस्तकाचे योग्य असे अभिप्राय लिहितात हे कौतुकास्पद बाब आहे. तसेच आमच्या माता पालक आम्हाला नेहमी शाळेत सहकार्य करतात व शाळेचे अध्यक्ष वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात.आज किरण नारायण कढणे यांच्या "ध्यासपर्व" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा देखील पार पडला त्याचेही खूप खूप अभिनंदन! कू.रितिका उंडाळ या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भाषण केले त्यांबद्दल तिचे भरभरून कौतुक केले.आज विद्यार्थ्यांनी खूप छान कविता सादर केल्या त्यांचं खूप खूप अभिनंदन. आत्तापासून आपल्याला कविता गायनाची, वचनाची आवड लागली तर निश्चितच एक उत्कृष्ट वाचक, लेखक निर्माण होऊ शकतो.त्यांनतर त्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग ७ वी ची कु.गौरी शाम गाभणे हिने केले तर आभार प्रदर्शन कु.तन्वी वानखेडे हिने केले.कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापिका ज्योती भाकरे शिक्षक अशोक ढोके, हिप्पी भिसडे, अनिल गोरे ,राधेश्याम गवळी, रघुनाथ करवते,सागर जाधव, हनुमान करवते, विलास बाजड, शिक्षिका राधा साबळे जया आरु,अर्चना बोलवार,मुखमाले ,गायत्री देशमुख,पार्वती सुर्वे शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर, शोभा पाचरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments