Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तातडीच्या बैठकीत महत्वाच्या पदावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.


कारंजा : दि 05 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता नितिन वाणी यांचा निवासस्थानी असलेल्या कारंजा पत्रकार कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तातडीची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांसह कारंजा व मानोरा तालुक्यातील पत्रकारांची प्रामुख्याने लक्षणीय उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वप्रथम विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर आणि अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिलजी फुलारी यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याची संपूर्ण माहिती देवून तातडीचे बैठकिचा उद्देश वाचून दाखवीला.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही पत्रकारांची संघटना निव्वळ पत्रकारांच्या न्याय्य्य हक्क आणि हितासाठी कटीबद्ध असून संघाने कोरोना काळामध्ये आजारी पत्रकारांना तसेच मृत पत्रकारांच्या वारसांना सहाय्यतेकरीता जवळ जवळ पाच कोटी रुपये निधी खर्च केल्याची माहिती देवून, प्रत्येक पत्रकारांच्या समस्या अडीअडचणीची संघटना जाण ठेवीत असल्याची माहिती दिली . शिवाय राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे,सरचिटणीस विस्वासराव आरोटे आणि वरिष्ठांच्या आदेशाने लवकरच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री व मंत्रीमहोदयांचे उपस्थिती मध्ये जिल्ह्यात पत्रकारांचे विदर्भस्तरिय अधिवेशन होणार असून त्यासाठी आपल्या सर्वांनी तयारीला लागण्याचे निर्देश दिले. बैठकीत यावेळी त्यांनी  विदर्भ उपाध्यक्ष म्हणून संजय कडोळे, अमरावती विभागीय उपाध्यक्ष दिलीप पाटील रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सी पी शेकुवाले, जिल्हाध्यक्ष म्हणून किरण क्षार, कारंजा तालुकाध्यक्ष म्हणून मोहम्मद लक्ष्मण मुन्निवाले, कारंजा शहर अध्यक्ष म्हणून नितीन वाणी, तालुका सचिव म्हणून योगेश यादव, तालुका कोषाध्यक्ष गोपाल कडू,जिल्हा ग्रामीण संघटक पदी संतोष गुल्हाने,मानोरा ग्रामिणचे तालुकाध्यक्ष म्हणून लोमेश पाटील चौधरी ,विदर्भ समन्वयक मोहित कर्नावट,शेलुबाजार सर्कल अध्यक्ष श्याम अपूर्वा,वनोजा सर्कल अध्यक्ष  विजय कोकरे यांना  नियुक्तीपत्र देवून त्यांचा गौरव केला. सर्व उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सुनिल फुलारी, किरण क्षार, अभय खेडकर, दिलीप पाटील रोकडे, अंकुश कडू, संजीव भांदुर्गे,प्रफुल बानगावकर, संजय कडोळे,मोहम्मद मुन्निवाले, गोपाल पाटील कडू, एकनाथ पवार, विलास राऊत, प्रदिप वानखडे, रोहित महाजन, उमेश अनासाने, लोमेश पाटील चौधरी, सैय्यद फारुक, संतोष गुल्हाने, हफिजखान, जिनवर तायडे , उद्योजक अनिश कर्णावट इत्यांदीसह बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments