धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमाण करतो. आता हे खपवन घेतले जाणार नाही.
"छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमाण करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही.
सतीश भाऊ हिवरकर पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांवर ४० दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले, एवढा अपमाण केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमाण आहे. आपल्या देशभक्तीचा अपमाण आहे. मी एवढेच सांगतो,
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।"
याप्रसंगी सतीश भाऊ हिवरकर, पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, डॉक्टर संजय राऊत,नंदू पाटील मुळे, कार्यकर्त्यांसह इत्यादींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला व जोळेमार आंदोलन केले. नारेबाजी करत, निषेध व्यक्त करण्यात आला
0 Comments