Ticker

6/recent/ticker-posts

पाल वस्तीवर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनश्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचा पुढाकार

वाशिम
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम आणि आरोग्य विभाग, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पालावर वस्ती करून राहणाऱ्या समुदायाच्या आरोग्य समस्यांवर उपाय व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच गरोदर महिलांना वैद्यकीय तपासणीसह आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. कुटुंब नियोजनाचा स्वीकार करून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या पुरुषांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्यांतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे, क्षेत्रकार्य समन्वयक प्रा. काकडे, प्रा. गोरे, प्रा. कव्हर व प्रा. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.

या शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, मनुष्यबळ आणि औषधसाठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या सहकार्याने उपलब्ध करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पार्टी टकमोरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कालवे यांच्या मदतीने शिबिर यशस्वीपणे पार पडले.

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल तापडिया, डॉ. कोमल चौधरी, तसेच आरोग्य सेविका एएनएम कु. नलिनी सपकाळ यांच्या प्रयत्नांनी विविध वयोगटातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम इंगोले, निरज चारोळे, विकास बोथीकर, अमोल बेले, आशीर्वाद सावळे, अक्षय अंभोरे, शिल्पा वैद्य, प्रतीक्षा बिच्छेवार, पूजा गायकवाड आणि विकास चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments