Ticker

6/recent/ticker-posts

राज्याच्या स्वच्छता दूतामुळे जिल्ह्याचे नावलौकिक, जिल्हा प्रशासनाला पडला विसर

वाशिम जिल्ह्यातील एकमेव महिला महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांचा गल्ली तो दिल्ली सन्मान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील संगीता ताई आव्हाळे यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला बारा हजार रुपये शौचालयाचे अनुदान मिळत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे जागतिक महिला दिनी विसर पडल्याचे दिसून आले आहे पआहे.
संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर देशाला स्वच्छतेचा संदेश देऊन राज्याच्या स्वच्छता दुताचे कार्य करीत असलेल्या संगीता अव्हाळे या महिलेमुळे स्वच्छतेचा जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्यातले नावलौकिक केले आहे 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोंबर 2014 रोजी गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश दिला त्याचा खरा अर्थ मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा या छोट्याशा गावातील संगीता आव्हाळे या महिलेला गवसला तिने सौभाग्य अलंकार विकून घरात शौचालय बांधले त्यानंतर तिला चांगलाच विरोध झाला माजी
 ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तिला मंगळसूत्र देऊन सन्मानित करून शौचालयाचे अनुदान चार हजार सहाशे वरून बारा हजार रुपये केले आज राज्याला 12000 मिळतात  ते केवळ संगीता ताई मुळेच तात्कालीन जिल्हा अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी आव्हाळे यांच्या कार्याची दखल घेत वाशिम जिल्ह्याच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले त्यावेळी संगीता आव्हाळे यांनी वाशिम जिल्ह्यात सात हजार शौचालयांचे भूमिपूजन केले होते तेव्हा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी संगीताला विभागाच्या ब्रँड अँबेसिडर बनविले वाशिम यवतमाळ च्या खासदार भावनाताई गवळी यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेतून सायखेडा गाव दत्तक घेऊन संगीताच्या कार्याची पावती देत ग्रामविकास घडविला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीता आव्हाळे यांना राज्याच्या स्वच्छता दूत म्हणून जाहीर करून वाशिम जिल्ह्याचे नावलौकिक केले आणि तेव्हापासून स्वच्छतेची खरी लोक चळवळ सुरू झाली वाशिम जिल्हा प्रशासन जरी हे विसरले असेल तरी मात्र अमिताभ बच्चन गोविंदा प्रियंका चोपडा सचिन तेंडुलकर हेमामालिनी स्व बिंदेश्वर पाठक यासारख्या दिग्गजांनी कार्याचे कौतुक केले. 
पद्मभूषण बिंदेश्वर पाठक दिल्ली येथे सन्मान 
दिल्ली येथे दरवर्षी स्वच्छतेवर आधारित कार्य करणाऱ्यांचा सन्मान होतो त्यामध्ये वाशिमच्या संगीता आव्हाळे यांचे नाव घेतल्या जाते त्यामुळे जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उजळले यात काही शंकाच नाही आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा

Post a Comment

0 Comments