Ticker

6/recent/ticker-posts

मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौऱ्यावर



प्रतिनिधी श्रावणी कामत

सोलापूर : 
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग येथे तपासणी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वापीक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षीक कामगिरीचा आढावा घेवून अभिलेखांची पडताळणी केली आहे. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आले आहेत. मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना नुकतेच महामहीम राष्ट्रपती पोलीस सेवा पदक हे दुसऱ्यावेळी मिळाल्याबद्दल करमाळा येथील नागरिकांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. तसेच वर्षभरात चांगले काम करणारे पोलीसांना प्रशिस्तपत्र देवून सन्मानीत करण्यात आले आहे.

आज दिनांक २१.०३.२०२५ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पंढरपूर येथे भेट देवून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भक्तीसागर (६५ एकर) परीसरात वृक्षारोप केले. त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत काळा मारूती या पोलीस चौकीचे उध्दघाटन मा. मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथील आगमनाच्या वेळी पंढरपूर शहरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी समस्त वारकरी, विश्व वारकरी सेना तसेच वारकरी संप्रदाय पाईक संघ यांचेकडून भक्तीमय व पारंपरीक पध्दतीने सत्कार करण्यात आला. पंढरपूर येथील सराफ असोशियसन, व्यापारी समिती, पोलीस पाटील संघटना व इतर प्रतिष्ठीत संघटनाकडून देखील सत्कार करण्यात आला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वार्षीक तपासणी दरम्यान वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिस्तपत्र देवून त्यांच्या कामगिरीचे कौतूक करण्यात आले आहे. त्यानंतर पोलीस ठाणेकडील तपासणी घेवून पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी ऐकून तात्काळ त्यावर उपाय सुचविण्यात आले आहेत.

आज दिनांक २१.०३.२०२५ रोजी रात्रीउशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्याची तपासणी सुरू असून उदईक दिनांक २२.०३.२०२५ रोजी सोलापूर येथील वार्षीक तपासणी घेण्यात येणार आहे,

सदर दौऱ्याप्रसंगी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री. अजीत पाटील, व मा.श्री. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.श्रीमती अंजना कृष्णा, सहायक पोलीस अधीक्षक, मा.श्री. राहुल मडावी, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांच्यासह इतर वरीष्ठ अधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments