मंगरूळपीर-मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींची दिनांक 18 /03/2025 मंगळवार रोजी गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळांनी एकदिवशीय शैक्षणिक भेट *तनुश्री पापड गृह उद्योग* मंगलधाम, मंगरूळपीर येथे भेट देण्यात आली.
या भेटीदरम्यान येथील संचालक श्री. दिलीप भाऊ क्षीरसागर तसेच सौ. नीलिमाताई क्षीरसागर आणि त्यांच्या आई यांनी आम्हाला या गृह उद्योगाची सुरुवात कशी झाली ?त्यासाठी कोणकोणत्या मशीनरीचा उपयोग केला .पहिल्यांदा खूप कमी मशिनरी होत्या परंतु हळूहळू मशीन यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि यापासून आम्हाला घरी बसल्या आपला गृह उद्योग सुरुवात करता आली. याकरिता आम्ही या गृह उद्योगांमध्ये सर्व प्रकारचे तांदूळ ,उडीद, उडीद मुगाचे, पापड तसेच शेवळ्या ,खारोड्या, विविध कुरडया इत्यादी विविध वर्षभर टिकणाऱ्या या सुरक्षित पदार्थ ाला इथं तयार करण्यात येते आणि भरपूर लोक आमच्याकडून या अन्न संरक्षणाच्या विविध प्रकारच्या पापड, कोरड्या, शेवया ,खिचे, खारोड्या घेऊन जातात. तसेच याकरिता काही पापडांचे आटे ते स्वतः तयार करतात तर काही ग्राहक घेऊन येतात आणि त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे ते त्यांना पापड करून देतात. या उद्योगाला पूर्णपणे हातभार त्यांच्या आईसाहेब, सोबतच पत्नी आणि मुलगी तनुश्री यांचा सक्रिय असा सहभाग असतो. सोबतच त्यांच्या या गृह उद्योगांमध्ये 3,4 मजूर सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा हे रोजगार देत आहे आणि हे एक उत्तम उदाहरण आहे महिला उद्योजकतेचा ,महिला सक्षमीकरणाचा. या विविध प्रक्रिया मधून पापड तयार झाल्यानंतर त्यांची पॅकिंग प्रक्रिया, वितरण सोबतच कशा विविध प्रकारे पापड वेगवेगळ्या मशीन द्वारे कसे बनले गेले हे सर्व पाहण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे उद्योग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आम्हाला सुद्धा उद्योजक होण्याचा विचार सुरू झाला. घरी बसल्या बसल्या आपला उद्योग सुरू करू शकतो आणि ही उद्योजक तिची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजू झाली.
या भेटीमध्ये बी.ए .भाग 2 चे विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला ,त्यात निकिता भगत, शिवानी मोरे, भक्ती सुर्वे ,राधा खांडरे, चैताली पाकधने ,गौरी ठाकूर, कल्याणी पाकधने, अश्विनी लहाने, लाजरी मिटकरी, आचल चव्हाण, अनामिका इंगोले, साक्षी भगत यांनी अतिशय उत्कृष्ट सक्रिय सहभाग घेतला. या भेटीचे संचालन निकिता भगत यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी मोरे यांनी मानले.
ही शैक्षणिक भेट संस्थेचे सचिव श्री. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणे ने प्रेरित होऊन, प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात, गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा. सौ सुषमा जाजू यांनी आयोजित केले व सदर शैक्षणिक भेट यशस्वीरित्या संपन्न झाली. या शैक्षणिक भेटीमध्ये 12 विद्यार्थ्यांनी नी सहभाग घेतला आणि शैक्षणिक भेट यशस्वीरित्या संपन्न झाली.
समन्वयक
प्राध्यापक सुषमा जाजू
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य. च.कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर जि. वाशिम
0 Comments