Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा संपन्न.


नैसर्गिक रंगाचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे.मानव जातीचे अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे.आपल्याला नैसर्गिक रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगाचा शोध बेरी आणि फळ,मूळ, खोड पाने यापासून करण्यात आला पण काळानुसार नैसर्गिक रंग मागे पडून होळी नंतर रंगपंचमी सणाला कृत्रिम रंगाची रंगांनी त्यांची जागा घेतलेली दिसत आहे.आपली संस्कृती जपताना निसर्गाची हानी होता कामा नये यासाठी यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला वाशिम येथे नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ,यावेळी माच्यावर शाळेचे प्राचार्य मा.एम.एस.भोयर, उपप्राचार्य एस.बी.चव्हाण , प्रमुख मार्गदर्शक. ए.ए.गवळी, एस.एस.मोळके, मॉड व्हीं.एम.जाधव उपस्थित होते.मंच्या वरील पाहुण्यांच्या स्वागता नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव वानखेडे यांनी केले.त्यानंतर सोहम कव्हर या विद्यार्थ्याने नैसर्गिक रंगाचे उपयोग याचे वेगवेगळे फायदे स्पष्ट केले.त्यानंतर ए ए गवळी यांनी अगोदरची होळी ,रंगपंचमी आणि सध्याची होणारी रंगपंचमी कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडली.त्यानंतर मार्गदर्शक एस एस मोळके यांनी रंग बनवण्याचा आनंद आणि तो निसर्गातील कोणकोणत्या वस्तू पासून बनवू शकतो हे स्पष्ट केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रंग बनवून दाखवले यामध्ये सोहम पारधी, गोपाल दुबळकर,अनिकेत मोरे, व प्रज्वल अंभोरे यांनी जांभळा रंग बीटा पासून बनून दाखवला यानंतर रणवीर बोलोदे ,लक्ष्मण बंडू मोहरे,ओंकार डाखोरे यांनी झाडाच्या पानापासून हिरवा रंग बनवून दाखवला नंतर आकर्षक पिवळा रंग हळद व पीठ वापरून आणि सुकलेल्या झेंडूच्या फुलापासून यश सावळे , ओंकार खुडे, राम महादेव डाखोरे यांनी बनविला यानंतर काळा रंग आदिनाथ आप्पाराव वानोळे ,गणेश मुंगशीराम शिकारे यांनी आवळ्यापासून तसेच कोळशापासून बनवून दाखवला अशा प्रकारे प्रात्यक्षिक वर्ग नववी मधील विद्यार्थ्यांनी करून दाखविले .यानंतर या सर्वांचे कौतुक शाळेचे उपप्राचार्य एसबी चव्हाण  यांनी केले .शाळेचे प्राचार्य आपण येथे पाहिलेले रंग आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या मित्राला आपल्या परिसरातील सर्वांना सांगून त्याचे फायदे व संस्कृतीचे जतन व पर्यावरण पूरक रंगपंचमी आपण साजरी करावी असे आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववी मधून राज सिद्धार्थ कळासरे व सिद्धांत दिलीप डोके यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्रीकांत पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन वर्ग नववी मधील सर्व विद्यार्थी व राष्ट्रीय हरित सेनेचे व गांधी रिसर्च फाउंडेशन चे सदस्य व्ही एम जाधव बी.वी.देशमुख,ए आर खांदवे , एन ए पडघान,एम एन वानखेडे ,पी.पी.पोळकट एस एस मोळके यांनी यशस्वीरित्या केले.असे प्रसिद्ध प्रमुख रमेश आर.पडवाल यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments