Ticker

6/recent/ticker-posts

य.च.सैनिक शाळेत बेल वृक्षाचे रोपण


       महाशिवरात्रीला देवाला बेलाचे पान वाहले जातात या सणाच्या निमित्ताने बेल फळातील उष्मा निवारक गुणधर्माकडे लक्ष वेधले जाते हा सण आला म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते बेल वृक्ष औषधी वनस्पती गुणधर्म दर्शवतात त्यामुळे यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुरू केला येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून बेल वृक्ष निसर्गातील अनन्य साधारण महत्व स्पष्ट केले. यावेळी शाळेचे प्राचार्य एम एस भोयर उपप्राचार्य एस बी चव्हाण हरित सेनेचे सदस्य एस एस मोळके व्ही एम जाधव,ए ए गवळी,एम एन वानखडे यावेळी उपस्थित होते.
           सर्वात प्रथम हरित सेनेचे सदस्य एस एस मोळके यांनी बेल वृक्षाचा उपयोग व औषधी गुणधर्म आणि बेलाचे वेगवेगळे उपयोग व त्याच्या पानखोड फळांचा औषधी उपयुक्त उपयोग व महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.यानंतर शाळेचे प्राचार्य एम एस भोयर यांनी भारतीय संस्कृतीत बेल वृक्षाचे फार महत्त्व आहे आपण वैज्ञानिक दृष्टीने बेल वृक्षाचे जतन करावे व आयुर्वेदामध्ये बेलाचे भावप्रकाश सुश्रुत संहिता भविष्याच्या रतवावली महत्त्व व्यक्त केले आहे त्यामुळे आपण सुद्धा बेलाचे अनन्यसाधारण महत्त्व समजून घ्यावे व निसर्गात त्याचे जतन करावे अशी आशा व्यक्त केली यानंतर बेल वृक्षाचे शालेय परिसरात रोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आणि शिक्षक सदस्य आर ए सरनाईक एस एस मोडके व्ही एम जाधव बी व्ही देशमुख, कु. डी पी पाटील एन ए पडघान एम एन वानखडे यांनी यशस्वीरित्या संपन्न केले.असे प्रसिद्ध प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments