Ticker

6/recent/ticker-posts

लोणावळा नगरपरिषद कडून INS शिवाजी खोपोली सार्वजनिक दुर्गा पूजा ट्रस्ट यांचा सन्मान


प्रतिनिधी श्रावणी कामत 

लोणावळा नगरपरिषदेने INS शिवाजी खोपोली सार्वजनिक दुर्गा पूजा ट्रस्ट यांचा त्यांच्या योगदानाबद्दल अथोचीत सन्मान केला आहे. दरवर्षीप्रमाणे, ट्रस्ट यांच्याकडून 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जाते. या वर्षी 26 जानेवारी 2025 रोजी लोणावळा डॅम परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील नागरिकांची सक्रिय सहभागिता आणि स्वच्छता मोहिमा राबविणारी संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन लोणावळा नगरपरिषदने या संस्थांचा सन्मान केला आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, मा. अशोक साबळे यांनी या प्रसंगी बोलताना, "या मोहिमा आणि संस्थांच्या योगदानामुळे लोणावळा शहर स्वच्छ राहते. यापुढेही शहराच्या स्वच्छतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.
लोणावळा नगरपरिषदने यापूर्वी देखील स्वच्छता मोहिमा राबवून शहरातील नागरिकांचा सकारात्मक सहभाग मिळवला आहे आणि यापुढे देखील या मोहिमा राबवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments