मंगरूळपिर--
पंचकोशीतील ग्राम दैवत योगतपस्वी संत बिरबलनाथ महाराज यांच्या यात्रा महोत्सवात आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी दि.१७ फेब्रुवारी रोजी लाभ घेतला.
येथील बिरबलनाथ महाराज संस्थान पंचक्रोषितील संत महंत यांचे उपस्थितीत महापूजा व महाआरती करण्यात आली. महाप्रसाद महिला व पुरुष अशा स्वतंत्र लाईन बारीमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आ. श्याम खोडे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी संस्थानच्या अध्यक्षा पुष्पाताई रघुवंशी,सचिव रामकुमार रघुवंशी, अविष रघुवंशी,सामाजिक कार्यकर्ते राम पाटील ठाकरे,उत्तमराव पाटील,सिताराम महाराज, प्रा.विरेंद्रसिह ठाकूर,कृष्णकुमार रघुवंशी,बाळु पाटील, नारायणराव बारड, पोलीस निरीक्षक सुधाकर आडे,तिवारी महाराज, आत्माराम पाटील, आदिंची उपस्थिती होती.
यात्रा मैदानात राजु बावणे यांच्या पुढाकाराने मनोरंजनासाठी झुले, मौत का कुवा ,गधा सर्कस, ट्रेन, टोराटोरा आकाश झुला, इत्यादी मन तृप्त करणारी अशी यात्रा भरली आहे.
0 Comments