श्री धानोरकर आदर्श विद्यालय (खुर्द )येथे 19 फेब्रुवारी 2025 रोजी रयतेचे कैवारी,जाणता राजा, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री मंगेशभाऊ धानोरकर सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राध्यापक श्री.भोयर सर,प्राध्यापक श्री पंचभाई सर,प्राध्यापक श्री नागे सर,प्राध्यापक श्री नंदनकर सर,विद्यालयाच्या विभाग प्रमुख जेष्ठ शिक्षिका सौ. अंजलीताई धानोरकर मॅडम,प्राध्यापिका सौ चौधरी मॅडम,शिक्षक श्री उचित सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेब व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून शिवगर्जना घेण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील वर्ग पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित आपली मनोगते, गीते,पोवाडा सादर केला तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री उचित सर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास सांगितला.तसेच प्राध्यापक भोयर सर यांनी जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य श्री मंगेशभाऊ धानोरकर सर यांनी महाराजांचा इतिहास सांगितला व आज कशाप्रकारे शिवजयंती साजरी करण्याची आवश्यकता आहे, त्यांचे विचार आज समाजामध्ये कशाप्रकारे रुजवावे आणी लोककल्याणकारी राज्य कसे निर्माण होईल याबद्दल महाराजांचा आदर्श घेऊन प्रयन्त करावे अशी माहिती देऊन उपस्थित सर्वांना या शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 8ची विद्यार्थिनी कु.श्रुती चव्हाण हिने तर आभार कुमारी अमिषा भगत हिने मानले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments