Ticker

6/recent/ticker-posts

य.च.सैनिक शाळेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


वाशिम.. सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत संपूर्ण जगाला शांती,प्रेम,अहिंसा, निसर्ग संवर्धन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा मोलाचा संदेश देणारे थोर क्रांतिकारक जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. 
तद्वतच मंचावरील सर्व मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले.इयत्ता सातवीतील गजानन घाटे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता दहावीतील सुदर्शन आडे या  विद्यार्थ्याने बंजारा भाषेत संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली.त्यानंतर इयत्ता नववीतील राजवीर बलोदे यांनी बंजारा लेंगी उत्कृष्ट सादर केली. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शाळेचे उपप्राचार्य एस.बी.चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल सखोल माहिती सांगून त्यांचे उपदेश बंजारा भाषेत सांगून मराठीत अर्थ समजून सांगितले जसे "कोई केनी भजो मत, कोई केणी पूजो मत, कोई केती कमी छेणी,भजे पुजे माई वेळ घाले पेक्षा कर्म करेर शिको!"अशा प्रकारे बंजारा समाज व संस्कृती तथा संत सेवालाल महाराजांची शिकवण तथा उपदेश साध्या सोप्या भाषेत सांगून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य एम.एस.भोयर यांनी आपल्या मनोगतात संत सेवालाल महाराज हे निसर्गप्रेमी तथा मानवतावादी होते त्यांचे पशुपक्षी प्राण्यावर प्रेम होते समाजासाठी देशासाठी झटणारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत सेवालाल महाराज लढवय्ये होते.नारीचा सन्मान करा वडीलधाऱ्यांचा आदर करा, खोटे बोलू नका, संकटांना न घाबरता निधड्या छातीने सामोरे जा अशा विविधांगी अशी माहिती दिली व संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेले तत्व उपदेश विद्यार्थ्यांनी अंगीकारावे आत्मसात करावे तरच ही खरी जयंती साजरी होईल असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.सदर कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक पी.पी.पोळकट व एम.एन.वानखेडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश ब्राह्मण यांनी केले तर आभार प्रदर्शन सुदर्शन आडे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीतील विद्यार्थी व वर्ग शिक्षिका कु.वर्षा वाजपेयी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते असे प्रसिद्ध विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments