Ticker

6/recent/ticker-posts

श्री.कामाक्षा देवी संस्थानतर्फे,युवा पत्रकार निलेश सोमाणी यांचा सत्कार. व उज्वल भविष्याच्या शुभेच्छा.

    
 कारंजा (लाड) : कारंजा तालुक्याच्या धनज (पोलास स्टेशन) या ग्रामिण भागातून पुढे आलेल्या निलेश पुनमचंद सोमाणी यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक - धार्मिक आध्यात्मिक कार्याचा वसा घेऊन आपली वाटचाल सुरु ठेवली.अनेक लहानमोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारितेपासून प्रारंभ करीत आज रोजी ते दैनिक मातृभूमी सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राचे वाशिम जिल्हा निवासी संपादक म्हणून कार्य करीत आहेत.नेहरु युवा केन्द्रा पासून वाटचाल करीत त्यांनी सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारचा युवा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदिवासी पुरस्कार,राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार इत्यादी मिळवीला. आपल्या प्रामाणिक,मनमिळाऊ, हास्यमुख, कार्यतत्पर,विश्वसनिय, सेवाव्रती,दानशूर स्वभावाने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढीत तरुण क्रांती मंचा द्वारे समाजकार्याची व्याप्ती वाढवून अख्ख्या समाजाला जिंकले आहे.मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शासन दरबारात त्यांना सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी बिनदिक्कत प्रवेश मिळतो.ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती आहे.आज रोजी त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून वाशिम शहराची निवड केली. निलेश सोमाणी हे कारंजा जन्मभूमिचे ते सुपूत्र असून त्यांच्या मातोश्रींनी त्यांना आयुष्यभर "सेवा करा !" असा मंत्र दिला असून,अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाली. छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत असलेल्या कारंजाच्या मातृशक्तिपिठ श्री कामाक्षा देवीच्या चरणी त्यांची नितांत श्रध्दा असून आपल्या निवडीनंतर निलेश सोमाणी यांनी नुकतेच आदिशक्ती श्री.कामाक्षा देवीचे दर्शन आशिर्वाद घेण्यासाठी श्री कामाक्षा देवी संस्थानला भेट दिली असता श्री. कामाक्षा देवी संस्थान तर्फे प्रमुख गोंधळी,महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रसाद देवून त्यांचा स्नेहमय सत्कार केला.व त्यांना भरभरून आशिर्वाद देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत लवकरच एक दिवस,आपली आई श्री कामाक्षा विधान परिषद किंवा विधानसभेवर वर्णी लागणारच.अशी मनोकामना व्यक्त करीत आलिंगन दिले.यावेळी संस्थानचे सचिव रोहित महाजन,ज्येष्ठ विधीज्ञ, प्रवचनकार अँड दिंगबरपंत पिंजरकर,युवा पत्रकार श्याम सवाई,वैदर्भिय नाथ समाज संघाचे अध्यक्ष युवा पत्रकार एकनाथ पवार,पत्रकार समिर देशपांडे,अभा मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments