Ticker

6/recent/ticker-posts

मा.आण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या बांधणीसाठी दि. ८ ला बैठक


अकोला. (प्रतिनिधी) 
पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक जन आंदोलन न्यासाच्या संघटना बांधणीसाठी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी 2025 दुपारी २ वाजता जिल्हा परिषद नगर खडकी अकोला घर क्रमांक सी.68 येथे जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. तरी ज्यांना या राष्ट्रीय लोक जन आंदोलन न्यास संघटनेत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे. यावेळी तालुका, शहर, व ग्राम शाखा स्थापन करण्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या  अध्यक्षतेखाली नुकतीच राळेगणसिद्धी येथे देश पातळीवर सकारात्मक कार्य करण्यासाठी व शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी  देश पातळी वरील राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटना स्थापन झाली आहे. सदर संघटनेचे पाच राज्यात संघटन बांधणीचे कार्य पूर्ण झाले असून आता पूर्ण महाराष्ट्रात संघटना बांधणीचे काम सुरू झाले आहे. त्याचा एक भाग म्हणून या संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा व  तालुका स्तरावरील संघटनेच्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. तसा आदेश त्यांना प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने  अकोला जिल्हा राष्ट्रीय लोक जन आंदोलन न्यास समितीचे संघटन बांधणीचे कार्य सुरू झाले असून या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केली जाणार आहे. तरी ज्यांना निस्वार्थ पणे समाजकार्या करण्याची आवड आहे. तसेच भ्रष्टाचाराची चीड आहे अशा सज्जन जागरूक नागरिकांनी, महिलांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी ,युवक युवतीनी या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

Post a Comment

0 Comments