Ticker

6/recent/ticker-posts

मानधन रखडल्याने कलावंताची जिल्हा कचेरीवर धडक : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

   
 वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार योजने अंतर्गत ज्येष्ठ साहित्यीक कलाकारांना दरमहा मानधन दिले जाते.मात्र वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच गरजवंत कलावंताचे मानधन गेल्या काही महिन्यापासून रखडल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे याप्रकरणी आता जिल्हाधिकारी मॅडम यांनी दखल घेवून कलावंताना मानधन मिळवून देण्याची मागणी होत आहे. व त्याकरीता सोमवार दि 03 फेब्रुवारी 2025 रोजी कलावंतानी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,परंतु मार्च 2024 मध्ये मंजूर 241 कलाकारांना 2024 च्या दिपावलीपूर्वी पाच महिन्याचे मानधन दिले होते.त्या पुढील महिन्यांचे आक्टोंबर,नोहेंबर, डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 असे जवळ जवळ चार महिन्यांचे मानधन मात्र रखडले आहे.यामध्ये विशेष बाब म्हणजे इतर जुन्या नव्या लाभार्थींना दरमहा नियमीत वेळेवर मानधन मिळत असतांना मार्च 2024 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मात्र मानधन मिळत नसल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे या सर्व व्यक्तींनी नोहेंबर 2024 मध्ये आपल्या संपूर्ण माहितिनीशी अद्यावत असलेल्या आधारकार्ड बँक खातेक्रमांक व मोबाईल नंबर सह (जीवन प्रमाणपत्र) हयात दाखले सुद्धा सादर केलेले आहेत तरी देखील मानधन मिळतच नसल्यामुळे वृद्धापकाळी मानधनावर अवलंबून असलेल्या गरजू कलाकारांमध्ये वैफल्य निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात वृद्ध कलावंतानी आपल्या मागण्यांचे निवेदन मा. बुवनेश्वरी एस,जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम तथा मा.वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना सादर केले आहे.निवेदन देते वेळी कांताबाई सुदाम लोखंडे विधवा कलावंत,शेषराव खुशालराव इंगोले दिव्यांग कलावंत,सुरेश रामभाऊ हांडे मतिमंद कलावंत,उमेश हरिभाऊ अनासाने ज्येष्ठ कलावंत,लोमेश पाटील चौधरी गुरुदेव सेवा मंडळ भजनी कलावंत,प्रदिप  विनायकराव वानखडे,दिव्यांग कलावंत,कैलास हांडे तथा विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments