ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज, गजानन महाराज प्रगट दिन व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . हेडगेवार रक्तपेढी अकोला यांच्या संयोजनाने श्री गजानन महाराज मंदिर हुडको कॉलनी मंगरूळनाथ येथे भव्य रक्तदान शिविराचे आयोजन केले होते याप्रसंगी शहरातील रक्तदात्यांनी स्वयंप्रुतीने सहभाग नोंदवला होता
यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान करून देश सेवेमध्ये आपला सहभाग नोंदविला. व रक्तदान करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे
आयोजन श्री मित्र मंडळ मंगरूळनाथ यांचे सदस्य सर्वश्री पवन सारडा ,शिरीष बियाणी, गुणवंत पिंपलकर,रमण शर्मा, रोहित भुतडा, सचिन बुरे, प्रफुल अहिरकर, मुन्ना भाऊ लोहिया व इतर सदस्यांनी केले होते. यामध्ये लोकप्रिय आमदार श्री श्याम भाऊ खोडे यांचे सुपुत्र सुरज भैय्या खोडे गणेश लुंगे, गोपाल वर्मा यांची उपस्थिती होती तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर हुडको कॉलनी अध्यक्ष गिरडेकर सर, नेहमी पुढाकार घेऊन जीवापार मेहनत करणारे शेळके सर, गोरे सर, देवा भाऊ राठोड, शेंद्रे काका, संजू भाऊ राठी व मंदिर कमिटीचे इतर सदस्यांचे मुलाचे सहकार्य लाभले दाना दान
रक्तदान हे श्रेष्ठदान मानले आहे.श्री मित्र मंडळ मंगरूळनाथ यांच्या उपक्रमाचे कौतुक पंचकोशीत केले जात आहे.
0 Comments