Ticker

6/recent/ticker-posts

सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू; अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत केले वेगवेगळे ३ गुन्हे दाखल


प्रतिनिधी श्रावणी कामत 

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान”  अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा येथे इसम नामे ताबान जायर पठाण वय २८ रा जी वार्ड इराणी चाळ हा मेफेड्रॉन पावडर (एम डी) ची ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पंच व पोलीस पथकासह बातमी मिळाले ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे ताबान पठाण याच्या अंगझडतीमध्ये ३.६२ ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर सापडली असून त्याची एकूण किंमत १५०००/- रुपये आहे. त्याबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला त्याच्या विरोधात NDPS एक्ट १९८५ चे कलम ८(क), २१(४) नुसार गुन्हा दाखल आहे. 
    दिनांक २६/१/२०२५ रोजी पहाटे श्री सत्यसाई कार्तिक सो सहा पोलीस अधीक्षक यांना गोपनीय रित्या बातमी मिळाली की युनिकॉर्न मोटार सायकल नंबर MH20GT0752 ही वर दोन इसम संभाजीनगर हून मोटार सायकल वर अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी घेऊन मुंबई बाजूकडे जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने लागलीच पंच व पोलीस पथकासह वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लागली असता मिळालेल्या बातमीमधील मोटार सायकल पहाटे ०५:०० वा चे सुमारास मिळून आली असून त्यावरील असलेल्या दोन्ही इसमांची नावे १) अक्षय गोपीनाथ जाधव वय २५ (२) प्रल्हाद आसाराम जाधव वय ३४ वर्ष दोन्ही रा आसेगांव या गंगापूर जि संभाजीनगर अशी असून त्यांच्याकडील शॅक(bag) ची झडती घेतली असता त्यामध्ये ६०,५१२/- रुपये किमतीचा १५.१२८ किलो ग्रॅम वजनाचा बिया बोंडासह हिरवट काळसर तपकिरी रंगाचा ओलसर गांजा विक्रीकरिता कोठेतरी घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन. २४/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे (NDPS) कलम ८(क), २०(ब)(ii), BNS ३(५) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात १ लाख रुपये किमतीची मोटरसायकल व ६०५१२/- रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण १,६०,५१२/- चा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. 
  दिनांक २६/१/२०२५ रोजी श्री सत्यसाई कार्तिक सहा पोलिस अधीक्षक याना सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार 
जोशवुड बंगला, ई सेक्टर, गोल्ड व्हॅली, तुंगारली, लोणावळा येथे काही इसम हे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पंचासह सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे १) अविनाश प्रकाश लोहार वय ३२ रा हडको कॉलनी लोणावळा 
२) आकाश दशरथ परदेशी वय ५२ रा गवळीवाडा लोणावळा 
३) बाजीराव गंगाराम मावकर वय ३९ रा तुंगारली लोणावळा 
४) शेखर रामदास बोडके वय ३० रा न्यू तुंगारली लोणावळा 
५) सूरज गणपत लोहट वय २७ रा गवळीवाडा लोणावळा 
६) अजय गजानन घाडी वय ५८ रा कामशेत 
७) संजय प्रभाकर कदम वय ५९ रा खंडाळा लोणावळा 
८) शंकर वसंत सकट वय ३५ रा भास्कर नगर अंबरनाथ ठाणे 
९) विनोद मारुती धुळे वय ४४ रा बाराबंगला लोणावळा 
१०) मकदूम गनी शेख वय ३३ रा देहूरोड 
११) सिरिल सॅमसुंदर मोजेस वय ४८ रा देहूरोड 
१२) सागर श्याम पवार वय ३५ रा गवळीवाडा वय ३५ रा गवळीवाडा लोणावळा 
१३) विकास भिमाजी पैलवान वय ३२ रा गवळीवाडा लोणावळा 
१४) जोशवुड बंगला मालक नाव पत्ता माहीत नाही
  वरील अ न १ ते १३ हे बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत तसेच अ न १४ यांनी वरील इसमाना तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी बंगला उपलब्ध करून दिला आहे सदर छाप्यामध्ये जुगाराचेसाहित्यासह एकूण ४,०८,४५०/-  रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुरन ५१/२०२५ मुंबई जुगार कायदा १८८७ कलम ४, १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. 
  वरील वेगवेगळ्या ३ कारवाईमध्ये एकूण १६ आरोपी अटक केले असून एकूण ५,८३,९६२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
        सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील सपोनि संतोष जाधव, पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार, अमोल तावरे, पारधी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments