शक्तिमान शो फ्रेम बॉलीवूड अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्ड आणि चिमूर तहसीलच्या पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम प्रमुख अतिथी
वाशिम:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर येथे यव्होवा यिरे फाऊंडेशन व्दारा आयोजीत भव्य रोजगार मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार तसेच राज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धेचे भव्य आयोजन दि.५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन एन टिव्ही न्युज मराठी चॅनलचे ब्युरोचीफ फुलचंद भगत यांनी केले आहे.सामाजिक कार्यकर्ते आणी पञकार फुलचंद भगत हे या कार्यक्रमाचे व्हिआयपी गेष्ट असणार आहेत.
चिमुर येथील कार्यक्रमाला शक्तीमान शो फेम बाॅलिवुड अभिनेञी वैष्णवी मॅकडोनाल्ड आणी चिमुर तहसिलच्या पोलिस ऊपनिरिक्षक दिप्ती मरकाम,तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार चिमूरचे मा.श्री.श्रीधर राजमाने हे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी ला चिमुर मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र लावणी क्वीन शिल्पा शाहीर, सि ई ओ राखी चौहान नागपुर देशोन्नती न्युज पेपर मुख्य व्यस्थापक श्री रितेश नायर, पञकार सामाजिक कार्यकर्ता श्री.फुलचंद जी भगत.दलितमिञ व आदीवासी सेवक जेष्ठ पत्रकार श्री.डी.के.आरीकर,प.सं.वि.स.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.रमेशकुमार बोरकुटे, प्रकल्प अधिकारी म.उ.वि.के.चंद्रपुर श्री.संदीप जाने, सहाय्यक आयुक्त जि.कौ.वि.रो.व उधो.मार्ग.के.चंद्रपुर श्री. भैय्याजी येरमे आणि इतर पाहुण्यांसह व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत
रोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योग रत्न पुरस्कार, सांस्कृतिक गट नृत्य स्पर्धा
यहोवा यिरे फाउंडेशन, कलाजीवन बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संवर्धन आणि विकास समिती आयोजित केला आहे.यहोवा यिरे फाउंडेशन, कलाजीवन बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संवर्धन आणि विकास समिती सारख्या संस्था समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करत आहेत. याच अनुषंगाने, ५ फेब्रुवारी रोजी चिमूरमध्ये रोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योग रत्न पुरस्कार आणि सांस्कृतिक गट नृत्य स्पर्धा असे रंगारंग कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि तरुणांना विविध करिअर पर्यायांबद्दल माहिती देणे आहे.दि.५ फेब्रुवारी रोजी चिमूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त मुकेश खन्ना यांच्या दूरचित्रवाणी मालिकेतील शक्तीमानमध्ये गीता विश्वासची भूमिका साकारणारी आणि ए मेरे हमसफर, शिल्पा शाहीर, महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी क्वीन, सेलिब्रिटी मेकअप यासारख्या कार्यक्रमांमध्ये दिसणारी बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्ड. कलाकार, रॉयल सलून नागपूरच्या सीईओ राखी चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोजगार मेळाव्यासोबतच उद्योग रत्न पुरस्कारही देण्यात येणार आहेत. याशिवाय कार्यक्रमात समूह नृत्य, समूह नृत्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये,द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये,तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये आहे. समूह नृत्य शुल्क ९९९ रुपये राखीव ठेवण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९८३४३२६२७३, ९६५७१३९८९९, ७७७४८२७०५४ वर संपर्क साधा. कार्यक्रमाचे ठिकाण, वेळ आणि अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन आयोजक समितीकडुन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण महाराष्टातील लोकप्रीय आणी आघाडीवर असणारी वृत्तवाहिनी N tv News Marathi या चॅनलवर करण्यात येणार आहे.
0 Comments