अकोला...
दिवसा झाडूच्या माध्यमातून गाव स्वच्छ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम गाडगे महाराजांनी आयुष्यभर केले असून त्यांनी दिलेली दशसूत्री हीच खरी जीवनाचां सार असून त्यांनी दिलेला संदेश भुकेलेल्या अन्न द्या,तहानलेल्या पाणी द्या,वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या,गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या,बेघर असलेल्यांना आसरा द्या,अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा,
बेरोजगारांना रोजगार द्या,
पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या,गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा,
दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या,हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक गजानन हरणे यांनी गाडगेबाबा नगर जुने शहर अकोला येथे गाडगेबाबा जयंतीला मार्गदर्शन करताना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश सोळंके तर प्रमुख वक्ता म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. निशात दामोदर, संघपाल शिरसाट, शेख सलीम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी गाडगेबाबा च्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन निशांत वाडेकर तर आभार प्रदर्शन प्रकाश तिवारी यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments