Ticker

6/recent/ticker-posts

मुलांनी वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करून त्यांचे ऋण फेडले पाहीजे. - समाजप्रबोधनकार संजय कडोळे.

              
या जगात जर परमेश्वर कोण आहे ? तुम्ही परमेश्वराला पाहीलं काय ? असे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतील.तर त्याचे उत्तर म्हणजे तुम्हाला जन्माला घालणारे तुमचे आईवडिल हेच खरे परमेश्वर आहेत.असे ज्येष्ठ समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.आज तरुणपिढीकडून  वयोवृद्ध आईवडिलांची होणारी हेळसांड पाहून,वृद्धाश्रमाची वाढती संख्या पाहून दुःखित अंतःकरणाने त्यांनी सांगीतले की,आईवडिल हेच आधुनिक काळातील दैवत आहे. परमेश्वर आहे. आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं.तुम्हाला हे जग दाखवीलं. तुम्हाला लहानाचं मोठं करून वाढवील.तुम्हाला हवं ते शिक्षण शिकवीलं.लहानपणापासून तुम्हाला विवाहबंधनात अडकविण्यापासूनचे सर्व सोपस्कार आणि त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यात.अशा आईवडिलांचे अनंत उपकार आजची तरुण पिढी मात्र पूर्णपणे विसरून जात असल्याने प्रचंड मनस्ताप होते. दुःख होते.डोक्यावर अक्षता पडून बायको घरात आली की,आजकालची नालायक तरुण मुले आईवडिलांचे (मातृऋण-पितृऋण) सर्व काही ऋण विसरून जातात.ज्यांनी मुलांकरीता वेळप्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून आपल्या मुलाला जगविण्याकरीता,त्याला वाढविण्याकरीता कितीतरी कष्ट घेतले.स्वतःचे सुखं आणि इच्छा आकांक्षा मनातच मारून,भयंकर यातना भोगल्यात.अशा स्वतःच्या म्हाताऱ्या जन्मदात्यांना विसरून, नव्यानेच घरात शिरलेल्या बायकोपायी जन्मदात्या आईवडिलांपासून वेगळे होऊन संसार थाटतात.मुलाबाळांचे जन्मापासून लालनपोषण करून त्यांना शिक्षण शिकवून स्वतःच्या पावलावर उभे करून त्यांचे थाटामाटात विवाह करून देणाऱ्या वयोवृद्ध आईवडिलांना आणि भाऊबंदकीला सपशेल विसरुन जातात.दोन दिवसांपूर्वी आलेल्या बायकोपायी,म्हाताऱ्या आईवडिलांची प्रतारणा करतात. त्यांचा अपमान करून त्यांना वाऱ्यावर सोडतात.किंवा वृद्धाश्रमात आणून सोडतात. आणि केवळ काही दिवसांपूर्वी त्यांच्या जीवनात आलेल्या बायकोचे चोसले पुरविण्यासाठी ती म्हणेल त्याप्रमाणे तिला झेलून,तिच्या आईवडिलांचे म्हणजेच सासु सासऱ्याचे चोसले पुरविण्यासाठी,आयुष्याच मातेरं करून घेतात.स्वतःची कमाई स्वतःचा पगार सार काही बायकोच्या हातामध्ये देवून तिचे गुलाम होऊन जगण्यात धन्यता मानतात.परंतु यांचे दुष्पपरिणाम भविष्यात काय होतील ? याचा या पापी नालायकांनी केव्हा तरी विचार केला काय ? स्वतःच्या वयोवृद्ध जन्मदात्या आईवडिल आणि भाऊबंदकीचा तिरस्कार करणाऱ्या अशा चौकटीतील नालायकांना पुढे स्वतःच्या औलादीवर देखील चांगले सुसंस्कार पाडताच येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संस्काराने त्यांची नालायक औलादही पुढे भविष्यात,त्यांच्या बायकोपिपासू वडिलांचा कित्ता गिरवित असतात.कारण तुम्ही जे पेरलं तेच उगवणार असतं.तुम्ही जसे कर्म कराल.तशीच फळं तुम्हाला मिळणार असतात.अशा नालायकांचा चोहीकडे धिक्कार व्हायला हवा.त्यांचा निषेधच व्हायला हवा.कारण अशा हरामी निच व्यक्तींना भविष्यात त्यांच्या पापी कृत्याची फार मोठी शिक्षा भोगावी लागणार असते.आईवडिल भाऊबंदकी आणि समाजव्यवस्थेचे  आशिर्वाद ज्यांनी घेतले.त्यांना जीवनात कशाचीही कमी पडत नाही.व ज्यांनी आपल्या आई वडिलांना टाळलं.त्यांची उपेक्षा केली.अशी मुले जीवनात केव्हाच यशस्वी होत नाहीत.त्यांचा शेवट वाईट होतो.त्यांची आयुष्यभराची कमाई,धनसंपत्ती भविष्यात एक तर त्यांच्या घराण्याशी मुळीच संबंध नसणाऱ्याचे तिराईत कुटुंबात जाते,चोराचे धन होते.किंवा सरकार दरबारी जमा होते.हा इतिहास आहे.शिवाय आई वडिलांची प्रतारणा करणाऱ्याचा मृत्यु देखील वाईटच होतो.त्यामुळे आपल्या समाज,देश आणि धर्माची जाणीव ठेवून आधुनिक विज्ञान युगातील आजच्या पिढीने, प्रत्यक्ष परमेश्वर असलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा सांभाळ केला पाहीजे.तुम्ही बाल्यावस्थेत असतांना ज्याप्रमाणे आईवडिलांनी तुमचा प्रेमाने आणि आनंदाने सांभाळ केला. त्याप्रमाणे तुम्ही देखील वृद्धावस्थेत असणार्‍या तुमच्या मायबापाचा सांभाळ केला पाहीजे.ज्याप्रमाणे तुमच्या आईने नऊ महिने नऊ दिवस तिच्या उदरामध्ये वाढवून तुम्हाला जन्माला घातले.तुमची सुss शिss धुवून तुम्हाला स्वच्छ ठेवले.निटनेटके कपडे घातले. त्याप्रमाणे म्हातारपणी तुम्ही देखील त्यांची सेवासुश्रूषा करून त्यांचे पांग फेडले पाहीजे.ऋण फेडले पाहीजे.आई वडिलांनी जसे तुम्हाला जेवणाचे घास भरवीले.तुम्हाला मिष्टान्न खावू घातले.तसे वृद्धापकाळी त्यांना घास भरवीले पाहीजे.तरच तुमचा शेवट गोड होणार असतो. आईवडिलांच्या सेवासुश्रूने तुम्हाला जीवंतपणी प्रत्यक्ष स्वर्ग दिसणार असतो.अन्यथा आईवडिलांची प्रतारणा करणाऱ्या नालायक मुलांना इथेच नरकाचा अनुभव येऊन स्वतःच्या पापाची फळे भोगण्याची वेळ येत असते. व हे त्रिकालाबाधी सत्य आहे.असे प्रतिपादन समाजातील वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येने चिंतीत होऊन आणि विविध घटनांच्या आढाव्यावरून, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजप्रबोधनकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले असून यामागे कोणाचेही अंत:करण दुखविण्याचा त्यांचा उद्देश नसून आजच्या तरुण पिढीतील मुलांनी त्यांच्याच जन्मदात्यांचा सांभाळ करावा. म्हाताऱ्या आईवडिलांचे वृद्धापकाळी हाल होवू नये.वृद्धाश्रमाची वाढती संख्या कमी होऊन वृद्धाश्रमाला आळा बसावा हा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments