मंगरूळपीर
मंगरूळपीर शहरातील श्री.संत बिरबलनाथ महाराज वार्षिक यात्रोत्सव निमित्त कृषी प्रदर्शन,शेतकरी समस्या निवारण व प्रगतिशील शेतकऱ्याचा सत्कार सोहळा दि 17 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नारायणराव बारड तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शाम खोडे,युवा उद्योजक राम ठाकरे,पत्रकार नंदलाल पवार,वीरेंद्रसिंह ठाकूर, विनोद जाधव,शारीक सौदागर, डॉ.संजय राऊत,काशिनाथ ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी महाराष्ट्र पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले
यावेळी तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे प्रगतीशील कास्तकार व कृषी विषयक बातम्या आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
या कृषी प्रदर्शनात महिला बचत गट यांचे उत्पादन प्रदर्शन व विक्री करण्याची अभिनव संकल्पना तसेच तालुक्यातील प्रगतशील कास्तकार यांनी आपल्या शेतातील उच्च प्रतीच्या पिकाचा नमुना या प्रदर्शनात ठेवण्यासाठी आणला होता यादरम्यान आमदार शाम खोडे यांनी संपूर्ण कृषी प्रदर्शनात फेरफटका मारून प्रत्येक शेतकऱ्याची सुसंवाद साधून त्यांच्या विवीध समस्या जाणून घेतल्या या प्रदर्शनात मंगरूळपीर तालुक्यातील शेतक-यांचे कृषी उत्पादने,माल यांचे प्रदर्शन तसेच नवीन संशोधित वाणांचे महाबीज यांचेकडून प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शेतकऱ्यांच्या अडचणी या प्रदर्शनात सोडविणेसाठी विशेष दालनाची खास व्यवस्था तालुका कृषी अधिकारी, मंगरूळपीर यांनी केली होती
या प्रसंगी शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, संचलन वैभव इंगळे यांनी तर आभार साकेत लांडे यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कृषी विभागातील सर्व कर्मचारी पुढाकार घेतला होता(श. प्र.)
0 Comments